जाहिरात

Navneet Rana: 'राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठीचा वाद..', नवनीत राणांनी ठाकरे बंधुंवर डिवचलं

हे सांगा की तुमचे मुलं मराठी शाळेत शिकले की हिंदी भाषेत शिकले?असा सवालही भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला. 

Navneet Rana: 'राजकीय पोळी भाजण्यासाठी मराठीचा वाद..', नवनीत राणांनी ठाकरे बंधुंवर डिवचलं

 शुभम बायस्कार, अमरावती: माझी जन्मभूमी व कर्मभूमीची मराठी भाषा पहिली, पण ज्या हिंदुस्थानात आम्ही राहतो त्या हिंदुस्थानातील दुसऱ्या क्रमांकावर हिंदी भाषेचा सुद्धा सन्मान केला पाहिजे, असं मत माजी खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे राज ठाकरे स्वतःची राजकीय पोळी शेकण्याकरीता व हिंदी मराठीमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या वर टीका करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

MNS Morcha News: 'मराठी'साठी एल्गार! मनसेचे पुन्हा खळखट्ट्याक; राज्यभरातून मनसैनिक मुंबईत धडकणार

काय म्हणाल्या नवनीत राणा?

मला शेवटच्या श्वासापर्यंत मराठीचा अभिमान राहील कारण मी या महाराष्ट्रात जन्माला आली, ज्या राज्यात तुम्ही राहतात ती भाषा सगळ्यात पहिली असते,माझी जन्मभूमी व कर्मभूमीची भाषा मराठी असल्याने मी तिला समोर ठेवणार आहे, पण ज्या हिंदुस्तानमध्ये मी राहते त्या हिंदी भाषेला सुद्धा दुसऱ्या क्रमांकावर आम्ही त्या भाषेचा सन्मान करतो, असं नवनीत राणा म्हणाल्या. अमरावतीमध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभामध्ये ते बोलत होते.

तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे स्वतःची राजकीय पोळी शेकण्याकरिता देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात तर मराठी व हिंदी भाषेत तेढ निर्माण करण्याचं काम करतात. त्यांनी हे सांगा की तुमचे मुलं मराठी शाळेत शिकले की हिंदी भाषेत शिकले?असा सवालही भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी उपस्थित केला. 

Nishikant Dubey: "आमच्या पैशांवर तुम्ही जगताय', हिंदी वादावरुन भाजप खासदार बरळले, थेट ठाकरेंना आव्हान!

 बरेच नेते हे हिंदी आणि मराठी भाषेमध्ये वाद घालून महापालिकेची पोळी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. कंधो से उचित छाती नही होती,धर्म से बडी कोई जाती नही होती,दीपक ही नही बचा तो बाकी का क्या करोगे?अगर धर्म ही नही बचा तो जाती का क्या करोगे त्यामुळे हिंदुस्थानात माझ्यासाठी धर्म आहे कर्म आहे पूजा आहे,यामध्ये हिंदूंचं विभाजन करू नका,असे वक्तव्य नवणीत राणा यांनी यावेळी केले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com