जाहिरात

Ashok Kharat: 'VSR चा मालक V.K सिंग अशोक खरातचा भक्त, अजित पवारांच्या अपघाताशी कनेक्शन...' बड्या नेत्याचा दावा

कॅप्टन अशोक खरातचे तब्बल 500 व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे. तसेच या व्हिएसआरचा मालक हा बाबाचा भक्त असल्याचेही अमोल मिटकरींनी म्हटले आहे. 

Ashok Kharat: 'VSR चा मालक V.K सिंग अशोक खरातचा भक्त, अजित पवारांच्या अपघाताशी कनेक्शन...' बड्या नेत्याचा दावा

सुनिल दवंगे, अहिल्यानगर:

Amol Mitkari On Ashok Kharat Case:  नाशिकचा भोंदुबाबा अशोक खरात प्रकरणात नवनवे खुलासे होत असून अनेक बडे नेते आणि अधिकारी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हे दिसत आहेत. या बाबाचा मंत्रालयातही वावर असल्याचे समोर आले आहे. याचबाबत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सर्वात महत्त्वाचा खुलासा केला असून कॅप्टन अशोक खरातचे तब्बल 500 व्हिडिओ असल्याचा दावा केला आहे. तसेच व्हीएसआरचा मालक हा बाबाचा भक्त असल्याचेही अमोल मिटकरींनी म्हटले आहे. 

काय म्हणाले अमोल मिटकरी?

"गेल्या दोन दिवसांपासुन अशोक खरात यांचे कारनामे समोर येत आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन प्रकरण पुढे आणले त्यांचे अभिनंदन. अशोक खरात याचा अजित पवार यांच्या दुर्घटनेमागे हात असण्याची शक्यता आहे. अजित पवार व्हिएसआर कंपनीच्या नादुरुस्त विमानात कोणाच्या सांगण्यावरुन बसले? मरीन ड्राईव्ह पोलिसांनी एफआयआर घेतली नव्हती त्याचे धागेदोरे अशोक खरातपर्यंत होते का?" असा सवालही आमदार रोहित मिटकरींनी उपस्थित केला आहे. 

Pune News: 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात,CM फडणवीसांनी स्पर्धेकडे फिरवली पाठ, कारण काय?

तसेच  "व्हीकेसिंग हा अशोक खरातचा भक्त असल्याची माहिती आहे. अशोक खरातच्या सांगण्यावरुन व्हीकेसिंंगने घातपात केला आहे का? अशोक खरात प्रकरणात एसआयटी स्थापन केली आता खरातचा अजित पवार विमान अपघातात हात आहे का याची चौकशी करा. बाबांचे, त्याच्या पुजा-यांचे, कर्मचा-यांचे, व्हीएसआरचे २ सप्टेंबर ते ३१ जानेवारीपर्यंतचे फोन सीडीआर तपासावेत. २८ जानेवारीला अजित पवार यांच्या घातपाताचे धागेदोरे भोंदु बाबा अशोक खरातपर्यंत येऊन पोहचत आहेत," अशी आमची शंका असल्याचाही दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. 

खरातचे 500 व्हिडिओ.. 

दरम्यान, शिर्डीत गुप्त बैठका घेणारे अधिकारी नेमके कोण होते? भांडे- पाटील आणि त्यांच्या कन्येसोबत आर्थिक व्यवहार झाले का? असा थेट सवाल मिटकरींनी केला आहे.  खरातच्या कथित साम्राज्यामागे नेमकी कोणाची साथ होती? दोन हजार कोटींची मालमत्ता कशी उभी राहिली? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  खरात प्रकरणात तब्बल ५०० व्हिडीओ असल्याचा दावा करत, त्यामध्ये अधिकाऱ्यांच्या महिलांचे संबंध होते का? हे तपासातून समोर येईल, असं मिटकरी म्हणाले. त्यामुळे आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट उच्चपदस्थांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचणार का? असा मोठा सवाल निर्माण झाला आहे. 

नक्की वाचा >> राज्यातील हॉटेल व्यवसायिकांसाठी आनंदाची बातमी! LPG Gas पुरवठ्याबाबत सरकारने घेतला सर्वात महत्त्वाचा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com