नववर्षाच्या स्वागतासाठी तुम्ही लोणावळ्यात येत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अवघे काही तास उरले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटकांनी कोकणासह महाराष्ट्राच्या विविध पर्यटनस्थळावर गर्दी केली आहे. याशिवाय नववर्षाची सुरुवात देवाच्या दर्शनाने करण्याची इच्छा बाळगून अनेक भाविक तीर्थस्थळी आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दरम्यान लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं मुंबई-पुण्यापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर असल्याने येथे कायम गर्दी पाहायला मिळते. दरम्यान पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करता लोणावळ्यातील लायन्स आणि टायगर या दोन्ही पॉइंटवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वनविभागाने 31 डिसेंबरच्या निमित्ताने ही बंदी घातली आहे.
नक्की वाचा - NDTV Marathi Impact : पुण्यातील 'त्या' पबला नोटीस, कंडोम अन् ORSचं वाटप रद्द
लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंटवर पर्यटकांना ही बंदी घालण्यात आली आहे. 31 डिसेंबर ते 1 जानेवारी असे दोन दिवस पर्यटकांना बंदी असणार आहे. याबाबत वडगाव मावळ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळं पर्यटकांचा मोठा हिरमोड होणार आहे. या निर्णयाला घेऊन स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असते, काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचं वनविभागाकडून सांगण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world