जाहिरात

Chhagan Bhujbal News: अखेर मंत्रिमंडळात एन्ट्री! नगरसेवक ते मंत्री, अशी आहे छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द

Chhagan Bhujbal Political Journey: पक्षाने त्यांना डावलल्याने भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर आता सहा महिन्यानंतर त्यांची मंत्रिपदी  वर्णी लागणार आहे. जाणून घ्या छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द.

Chhagan Bhujbal News: अखेर मंत्रिमंडळात एन्ट्री! नगरसेवक ते मंत्री, अशी आहे छगन भुजबळांची राजकीय कारकीर्द

Chhagan Bhujbal Political Profile: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा एन्ट्री होणार आहे. आज छगन भुजबळ हे अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपदाची शतथ घेतील. विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र पक्षाने त्यांना डावलल्याने भुजबळांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. अखेर आता सहा महिन्यानंतर त्यांची मंत्रिपदी  वर्णी लागणार आहे. जाणून घ्या छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

15 ऑक्टोबर 1947 रोजी छगन भुजबळ यांचा नाशिकमध्ये जन्म झाला. त्यांनी मुंबईतील व्ही. जे. टी. आय.मधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली आहे. तरुणपणीच त्यांनी शेती व शेतीवर आधारित व्यवसाय केला. अगदी सुरुवातीपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस घेतला. शाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडत त्यांनी दि.1 नोव्हेंबर 1992 साली समता परिषदेची स्थापना करण्यात आली.

1973 मुंबई महापालिकेवर निवड झाल्यानंतर छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.  1973 ते 84 मध्ये ते महापालिकेत विरोधी पक्षनेता होते. त्यानंतर 1985 मध्ये त्यांनी मुंबईचे महापौर म्हणून काम पाहिले.  1991मध्ये ते दुसऱ्यांदा महापौर झाले. 1985 ते 1990 अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून त्यांची विधानसभेवर निवड झाली. नोव्हेंबर 1991 मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे 1995  पर्यंत ते मंत्री होते.  एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले. 

( नक्की वाचा :  Exclusive: काश्मीरला जा, फोटो घे... ISI एजंट आणि हेर यांच्यात काय झाली चर्चा? )

1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हापासून ते राष्ट्रवादीचे सदस्य आहेत. एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले.  2004 मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली. 

नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री होते.  8 डिसेंबर 2008 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. 2009 मध्ये दुसऱ्यादा तर 2014 मध्ये तिसऱ्यांदा व 2019 मध्ये सलग चौथ्यांदा येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवड झाली.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये  दि.28 नोव्हेंबर 2019 पासून राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.  महायुती सरकारमध्ये सामील होऊन 2 जुलै 2023 पुन्हा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.दि.23 नोव्हेंबर 2024 पाचव्यांदा येवला विधानसभा मतदासंघातून आमदार म्हणून निवड झाली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com