जाहिरात
2 months ago

आज छगन भुजबळ यांचा शपथविधी आज राजभवनात पार पडणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक महायुतीचे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. आज राज्यमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत अवकाळी पावसाच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना मदतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कोकण रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटविण्यात प्रशासनाला यश

कोकण रेल्वे मार्गावर कोसळलेली दरड हटविण्यात प्रशासनाला यश आलं आहे.  दरड हटविण्यात आल्याने वाहतूक  पूर्वपदावर येत आहे.  जवळपास दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर वेरवली - विलवडे स्टेशन दरम्यान संध्याकाळी दरड कोसळली होती.

त्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला होता. 

मुंबईला पावसाने झोडपले, अरबी समुद्र खवळण्याची शक्यता; मच्छीमारांना सतर्कतेचं आवाहन

मुंबईला पावसाने झोडपले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचसे आहे. मुंबई उपनगरात पाणी साचल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्याही घटना घडल्या आहे. 

महाराष्ट्र आणि गोव्या जवळ अरबी समुद्रात 21 मेपासून कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 24 मेपर्यंत तो अधिक तीव्र होऊन उत्तरेकडे सरकू शकतो. राज्याच्या किनाऱ्याला थेट धोका नसला तरी याचा परिणाम म्हणून समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहे.

22 ते 24 मे दरम्यान रायगड, रत्नागिरी, मुंबई आणि पालघरजवळ समुद्र खवळू शकतो, तर खोल समुद्रात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमाऱ्यांनी हवामान बदलांवर लक्ष ठेवून या काळात खोल समुद्रात जाणे टाळावे, असा इशारा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे.

पुण्यात जोरदार पाऊस

पुण्यात खडकवासला, किरकटवाडी परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्याच्या इतर भागालाही पावसाने झोडपले आहे. 

पावसाचा कोकण रेल्वेला फटका

पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे.  कोकण रेल्वे मार्गावर वेरवली - विलवडे स्टेशन दरम्यान दरड कोसळली आहे.  त्याचा कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.  संध्याकाळची ही घटना आहे.  त्यामुळे रेल्वे गाड्या ठिकठिकाणी थांबून ठेवण्यात आल्या आहेत.  दरड हटविण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. गोव्याच्या दिशेने नेत्रावती एक्सप्रेस रत्नागिरीत थांबून ठेवण्यात आली आहे. तर मुंबईकडे जाणारी जन शताब्दी एक्सप्रेस वैभववाडीत थांबून ठेवण्यात आली आहे.  मुंबईकडे जाणारी तेजस एक्सप्रेस ही कणकवलीमध्ये थांबून ठेवण्यात आली आहे. 

पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर

आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या पालघरला नवे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर झाले असून आता पालघर जिल्ह्याला MH-60  हि नवीन परिवहन ओळख मिळाली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर तळेगाव ते देहू फाट्याच्या दरम्यान बोगद्याजवळ दगड कोसळली आहे.  त्या बोगद्याजवळ वाहतूक ही थांबवली गेली आहे. अशा स्थितीत पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. दरड काढण्याचे काम सुरू आहे. 

कल्याणमध्ये इमारत कोसळली, 6 जणांचा मृत्यू

कल्याण पूर्वेला इमारत कोसळली आहे. यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे महापालिकेचे सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. 

IB च्या संचालक पदी तपन कुमार डेका यांची नियुक्ती

इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकपदी तपन कुमार डेका यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  आयपीएस असलेल्या डेका यांची नियुक्ती झाल्याचे केंद्राने जाहीर केले आहे. 

पुण्यात मुसळधार पावसात हार्डिंग कोसळले

पुण्यात मुसळधार पावसात हार्डिंग कोसळले  

सात ते आठ दुचाकी होर्डिंग खाली अडकल्या 

कोणीही जखमी नाही

पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोली जवळ सणसवाडी येथे होर्डिंग कोसळले 

ब्रेक फेल झालेल्या एसटीने चार जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात स्वस्तिक टॉकीज परीसरात एसटीचे ब्रेक फेल झाले. ब्रेक फेल झालेल्या एसटीने दोन दुचाकी स्वारांसह चार जणांना चिरडले आहे. या अपघातात दोन जण ठार झाले आहे.  दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. रवींद्र बहारे (वय 40 वर्ष) व सोनू रशीद पठाण (वय 22 वर्ष) अपघातातील मृतांची नावे आहेत.  अनिता बहारे व शाकीर शेख हे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.

Live Update : पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पालघर जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी

अज्ञात ई-मेल द्वारे कलेक्टर ऑफिस उडवण्याची धमकी 

कलेक्टर ऑफिसमध्ये टायमर लावून बॉम्ब ठेवल्याची धमकी

पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह पोलीस यंत्रणा सतर्क

संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय रिकामे करून शोध मोहीम सुरू

Live Update : सरन्यायाधीश भूषण गवई अपमान प्रकरणात नाना पटोले यांचे राष्ट्रपतींना पत्र

सरन्यायाधीश भूषण गवई अपमान प्रकरणात नाना पटोले यांचे राष्ट्रपतींना पत्र

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अपमान प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि अधिकारीवर कठोर कारवाई करण्याची केली मागणी

Live Update : मीरा भाईंदर महापालिका समोर राष्ट्रवादी पक्षाचे आंदोलन

मीरा भाईंदर महापालिका समोर राष्ट्रवादी पक्षाचे आंदोलन 

जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु 

शहरातील अनेक नागरी समस्या बाबत आयुक्त भेटत नाही,वेळ देत नाही,त्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे

शहरातील अनधिकृत बांधकामे,निकृष्ट दर्जाचे रस्ते,पाणी समस्या,शासकीय रुग्णालयाची दुरवस्था,अश्या अनेक समस्या आहेत 

पालिका आयुक्त यांना भेटायला वेळ नाही तर समस्या कश्या सोडवणार असा आरोप जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी केला

Live Update : मुंब्रा-कळवा मार्गावर रेड्याला लोकलची धडक, डाऊन जलदची वाहतूक खोळंबली

मुंब्रा रेल्वे स्टेशन दरम्यान कळवा मार्गावर डाऊन जलद लाईनवर एक रेड्याचा लोकलची धडक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. त्या गाडीच्या चाकाला तो रेडा चिकटला असल्याने त्या मार्गावरील वाहतूक खोळंबली असून ही मार्गिका बंद ठेवण्यात आली आहे. ठाण्या पुढील कल्याणकडे जलद मार्गाने येणारी सर्व वाहतूक डाऊन स्लो मार्गावर वळवण्यात आली असल्यामुळे वाहतुक अनिश्चित काळाने सुरू आहे. 

LIVE Updates: जयंत नारळीकर यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी: शरद पवार

LIVE Updates:ज्ञान-विज्ञानाच्या नभांगणातील तेजस्वी तारा निखळला: उपमुख्यमंत्री अजित पवार

“जागतिक किर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात देशाला नव्या उंचीवर नेलं. विज्ञानाची सूत्रे, विज्ञानवादी विचार, वैज्ञानिक दृष्टीकोन नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी जीवनभर कार्य केले. विज्ञानाची रहस्ये सहज-सोप्या भाषेत मुलांना समजावून सांगितली. त्यांच्या निधनाने ज्ञान-विज्ञानाच्या प्रसारासाठी वाहून घेतलेला देशाच्या वैज्ञानिक नभांगणातील तेजस्वी तारा निखळला आहे,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Beed News: चक्काजाम आंदोलन केल्याप्रकरणी 50 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा

बीडमध्ये एसटी वाहकाला झालेल्या मारहाण प्रकरणात एसटी कर्मचाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 50 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी तब्बल तीन तास एसटी कर्मचाऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले होते. त्यामुळे विना परवाना आंदोलन केल्याप्रकरणी ५० एसटी कर्मचाऱ्यांवर हा गुन्हा नोंदविला गेला.

Live Updates: छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पुण्यात जल्लोष

छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच पुण्यात जल्लोष 

पुण्यातील महात्मा फुले वाड्यात पेढे वाटत जल्लोष 

ओबीसी समाजाकडून पुण्यातील समता भूमी येथे  जल्लोष 

राज्य मंत्रिमंडळात भुजबळ आणि शपथ घेतल्यानंतर पुण्यातील ओबीसी समाजाकडून आनंद व्यक्त

ओबीसी समाजाकडून महात्मा फुले वाड्यात फुलांची उधळण

LIVE Updates: ज्यावेळेस काही करु तेव्हा उघडपणे करु: जयंत पाटील

राजकीय बदनाम करण्याचे काहीजण काम करतात. मला शपथ घ्यायची म्हणून काहीजण अफवा पसरवत असतात - शरद पवार एनसीपी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया 

एनडीटीव्ही मराठीला दिली प्रतिक्रिया 

ज्यावेळेस काही करायचे असेल त्यावेळी उघड करू. विनाकारण बदनामी का करतात - जयंत पाटील 

आम्ही शरद पवार यांच्या आदेशान काम करतो करत राहील - जयंत पाटील

LIVE Updates: छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळाल्याने धाराशिवमध्ये जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील एन्ट्रीनंतर धाराशिव मध्ये समर्थकांनी जल्लोष केलाय  धाराशिव शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने फटाक्याची आतषबाजी करून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केलाय. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावाने मोठी घोषणाबाजी केली.

Chhagan Bhujbal Oath Ceremony: छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह महत्त्वाचे नेते यावेळी उपस्थित होते. राज्याच्या राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 

Chhagan Bhujbal: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राजभवनात दाखल

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार राजभवनावर दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात छगन भुजबळ हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

LIVE Updates: थोड्याच वेळात छगन भुजबळांचा शपथविधी

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे आज मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. सकाळी दहा वाजता छगन भुजबळ यांचा शपथविधी होईल. 

Live Update : नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद वाढणार?

नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची वाढणार ताकद

- छगन भुजबळांच्या रुपात नाशिकला मिळणार चौथे मंत्रिपद

- नाशिकमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7, भाजपचे 5, शिवसेना शिंदे गटाचे दोन तर एमआयएमचे एक आमदार

- माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ पाठोपाठ भुजबळ राष्ट्रवादीचे तिसरे मंत्री 

- भुजबळांच्या मंत्रीपदामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा वाढणार की सुटणार याकडे लक्ष ?

Live Update : राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी

राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले आहेत

Live Update : वक्त वक्त की बात है.. आज तेरा है, कल मेरा आयेगा! छगन भुजबळांची जुनी शायरी व्हायरल

वक्त वक्त की बात है.. आज तेरा है, कल मेरा आयेगा!

छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेणार. दरम्यान कार्यकर्त्यांकडून भुजबळांची जुनी शायरी सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. 

Live Update : छगन भुजबळ यांना कशी मिळाली मंत्रिमंडळात संधी? भुजबळ यांचा परतीची Inside Story

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com