Omraje Nimbalkar- Uddhav Thackeray: धाराशिवचे ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेने ऑपरेशन टायगरबाबत सस्पेन्स वाढला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात जाण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगत आज आपण भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे ओमराजेंच्या मनधरणीसाठी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांनीही पुण्यामध्ये मध्यरात्री त्यांची भेट घेतली. या भेटीची इनसाईड स्टोरी आता समोर आली असून ओमराजेंनी उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर येऊन भूमिका मांडतो, असं सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Omraje Nimbalkar: रात्रीस खेळ चाले! ओमराजेंसाठी ठाकरेंचा अखेरचा डाव, सावध शिदेंनीही फिल्डिंग लावली
ओमराजे निंबाळकर- उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा
समोर आलेल्या माहितीनुसार, ठाकरे सेनेच्या शिष्टमंडळाने काल रात्री ओमराजे निंबाळकरांची भेट घेतली. धाराशिवचे आमदार कैलास पाटील तसंच वरुण सरदेसाई यांनी ओमराजे निंबाळकरांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत माझी भूमिका मांडायला मातोश्रीवर येतो, असं ओमराजे निंबाळकर यांनी कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांना सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकरांची भूमिका जाणून घेतली, ओमराजे यांचे नेमकं म्हणणं काय आहे? हे उद्धव ठाकरेंनी समजून घेतले. आपण पक्षासोबत आहोत आपण कुठलाही निर्णय घेतला नाही असं ओमराजे यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले. आपणच मला मोठं केलं आहे आज मी खासदार आहे ते पक्षामुळे तुमच्यामुळे त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतला नाही. मी कार्यकर्त्यांसोबत सगळ्या बाबतीत चर्चा करणार आहे, असे उद्धव ठाकरेंना ओमराजे निंबाळकर यांनी सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे.
संजय राऊतांच्या टिकेमुळे व्यथित..
दुसरीकडे, ठाकरे सेनेच्या दुहेरी भूमिकेमुळे ओमराजे निंबाळकर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल शनिवारी लागला. मात्र या लढ्यात अपयश आल्याने ओमराजे निंबाळकर अस्वस्थ होते. त्याचवेळी ओमराजेंना सहानुभूती न दाखवता संजय राऊतांनी असंवेदनशिलपणाने टीका केली. ओमराजेंचा उल्लेख रिलस्टार असाही करण्यात आला. एकीकडे शिव्यांची लाखोली वाहिली जात असताना दुसरीकडे ओमराजेंचं मन वळवण्याचे प्रयत्न ठाकरे सेना करत होती. या दुहेरी भूमिकेमुळे तसंच असंवेदनशिल टीकेमुळे ओमराजे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world