जाहिरात

Onion farmers : मधमाशांची संख्या घटल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत; मधमाशा अन् कांद्याचा संबंध काय?

महाराष्ट्रातील कांदा लागवड शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं राहील असून, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.

Onion farmers : मधमाशांची संख्या घटल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत; मधमाशा अन् कांद्याचा संबंध काय?

अविनाश पाटील, प्रतिनिधी

निसर्गाचा नियम कोणी मोडीत काढू शकत नाही. या भूतलावर सर्वात शाश्वत आणि सत्य काही असेल तर ते पर्यावरण आहे. मानवाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे त्याची हानी होत असून मानवी अस्तित्वाचं भविष्य अधिक धूसर आणि काळोखात असण्याची चिन्हे आहेत. कृषी हा भारतीय अर्थ व्यवस्थेचा पाया, परंतु शेती व्यवसाय दिवसेंदिवस अधिक आव्हानात्मक होताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील कांदा लागवड शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं राहील असून, कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. वातावरणीय बदल आणि कीटक नाशकांच्या अती वापरामुळे मधमाशांचे प्रमाण कमी होत चाललं आहे. कांदा लागवड आणि बीज उत्पादनासाठी परागीकरण (Pollination) अत्यंत महत्वाचं असतं, कारण याच्या मदतीनेच बिजोत्पादन वाढतं. कांदा उत्पादनासाठी नाशिक जिल्हा प्रसिद्ध असून जालना जिल्हा कांद्याच्या बीज उत्पादनासाठी ओळखला जातो. मात्र बीज उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

परागीभवन ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्यात परागकण एका फूलाच्या मकरंधकोषापासून दुसऱ्या फूलाच्या स्त्रीकेंद्राशी पोहोचते. ही प्रक्रिया बहुतेक वेळी मधमाशा, वारा किंवा इतर कीटक यांद्वारे केली जाते. परागीभवनामुळे वनस्पतींच्या प्रजनन प्रक्रियेस मदत होते, ज्यामुळे फळे, बी, किंवा इतर वनस्पतींची प्रजाती तयार होतात. मधमाश्यांचे प्रमाण कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो. मधमाश्या परागीकरणासाठी महत्त्वाच्या असतात, ज्यामुळे अनेक पिकांच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. कांद्याच्या पिकासाठी देखील परागीकरण महत्त्वाचे आहे, कारण मधमाश्या व इतर कीटक परागीकरण करत असतात, ज्यामुळे उत्पादन वाढीस मदत होते. 

Shirdi News: शिर्डीच्या साईमंदिर परिसरातील कुत्रे का होतायत लठ्ठ? मोठं कारण आलं समोर

नक्की वाचा - Shirdi News: शिर्डीच्या साईमंदिर परिसरातील कुत्रे का होतायत लठ्ठ? मोठं कारण आलं समोर

जालना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या बियांची शेती केली जाते. आणि रब्बी हंगामात संपूर्ण राज्यभरात बीज उत्पादनासाठी लागवड होते. परंतु, यंदा मधमाशांचे प्रमाण अत्यल्प असल्याने नैसर्गिक परागीभवन कमी प्रमाणात होणार आहे. परिणामी, बीज उत्पादन घटण्याचा धोका आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होऊ शकतो. विपुल प्रमाणावर मधमाशा असतील तर, त्या कांद्याच्या फुलोऱ्यावर बसून परागीकरण घडवून आणतात. यंदा नैसर्गिकरीत्या मधमाश्या उपलब्ध नसल्याने परागीभवन अपुऱ्या प्रमाणात होणार आहे. शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काही उपाय योजना करण्याची गरज आहे. 

शेतकऱ्यांनी करावयाचे उपाय
कमी लागवडी क्षेत्रासाठी ज्या शेतकऱ्यांकडे दहा गुंठे ते एकर पर्यंत जमीन आहे, त्यांनी सकाळी ८ ते ९ वाजेच्या दरम्यान कांद्याच्या फुलांवर परागीभवन करण्यासाठी हाताने पराग वितरित करण्याची पद्धत वापरवी. साधारणतः फुलांचा पराग दुसऱ्या फुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी यातून मदत होते. याला कृत्रिम पोलिनेशन असं म्हणतात. 

मोठ्या क्षेत्रासाठी साडीचा वापर
ज्या शेतकऱ्यांकडे एक एकर किंवा त्याहून अधिक कांदा शेती असेल त्यांनी साडीचा वापर करून कांद्यावर परागीकरण घडवून आणावे. साडीचा काठ किंवा फुलांचा गंध आणि रंग एक आकर्षक घटक म्हणून काम करू शकतो. साडीचा काठ कांद्याच्या फुलांच्या तंतूंवर फिरवून पराग एका फुलापासून दुसऱ्या फुलापर्यंत पोहोचवता येतो. कांद्याच्या फुलांच्या भोवतालच्या भागात साडीचे कापड हलवून हवेतील पराग एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाऊ शकतो. यामुळे कृत्रिमरीत्या परागीकरण घडवता येईल.साडीला हलवून किंवा त्यावर फुलांची पावडर (पराग) चढवून त्याचा दुसऱ्या फुलावर हस्तांतर करता येतो. यामुळे परागीकरण प्रक्रिया घडवून उत्पादन वाढवता येते. ही पद्धत फार साधी आणि कमी खर्चिक असली तरी ती कामी येऊ शकते.

मधमाशा वाढवण्यासाठी पेट्या ठेवा
मधमाश्यांची पेटी शेतात अशा ठिकाणी ठेवावी जिथे हवामान सौम्य असावे आणि पर्यावरण सुरक्षित व निसर्गसुलभ असावा. कांद्याच्या पिकाच्या जवळ, ओपन एरियामध्ये मधमाश्यांची पेटी ठेवली तर ती अधिक कार्यक्षम होईल. कांद्याच्या फुलांवर मधमाश्या स्वाभाविकपणे आकर्षित होतात.मधमाश्या कांद्याच्या फुलांवर पराग पोहोचवून परागीकरण प्रक्रिया सक्षमपणे पूर्ण करतात. यामुळे कांद्याच्या उत्पादनात वाढ होऊ शकते.

शेतकऱ्यांवर महागडे बियाणे खरेदी करण्याची वेळ
कृषी तज्ज्ञ दिलीप देवरे यांच्या मते, कीटक नाशकांच्या अतिवापरामुळे दिवसेंदिवस मधमाश्यांच्या संख्येत कमालीची घट होत चालली आहे ही वस्तुस्थिती आहे. त्याचा परिणाम परागीकारणावर होत आहे. नैसर्गिक पद्धतीने बीज उत्पादन करण्यात परागीकारण हा महत्वाचा भाग आहे.खास करून कांदा बियाणे उत्पादनाला त्याचा मोठा फटका बसणार आहे. कांदा उत्पादक प्रामुख्याने नैसर्गिक पद्धतीने कांदा बियाणे तयार करतात. मात्र मधमाश्यांची संख्या घटल्याने पुढच्या काळात नैसर्गिक कांदा बियाण्यांचे उत्पादनही घटण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना महागडे बियाणे खरेदी करावे लागणार असून त्यांच्या उत्पादन खर्चही वाढणार आहे. हा धोका टाळण्यासाठी मधमाश्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: