CM Fadnavis Election Postponed : नगरपंचायत आणि नगरपरषद निवडणुकीसाठी उद्या म्हणजे 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असताना, अचानक निवडणूक आयोगाने काही ठिकाणी निवडणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला. कायदेशीर मुद्द्यांमुळे पेच निर्माण झाल्याने निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. ज्याचा फटका अनेक मागील अनेक दिवसांपासून मेहनत घेणाऱ्या उमेदवारांना बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
CM देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. निवडणुका रद्द करणे अत्यंत चूक आहे. अशापद्धतीने कुणीही कोर्टात जाईल आणि निवडणूक पुढे ढकलली जाईल. असं आजपर्यंत कधीच झालं नाही.
निवडणूक आयोग कुठला कायदा काढतंय, कुणाचा सल्ला निवडणूक आयोग घेतंय, याची मला कल्पना नाही. मात्र जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, अनेक वकिलांशी मी बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे, अशा पद्धतीने एखादा व्यक्ती कोर्टात गेला म्हणून निवडणुका पुढे ढकलता येत नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- Holiday in Maharashtra: महाराष्ट्रात 2 डिसेंबरला पगारी सुट्टी; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय)
निलंग्यात सगळी प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यानंतर एका उमेदवाराचा फॉर्म रद्द झाला होता, तो कोर्टात गेला. कोर्टाने त्याचा फॉर्म फेटाळून लावला. त्यामुळे ज्यांनी फॉर्म भरले, त्यांना पूर्ण वेळ मिळाला, असा दाखलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.
प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय- मुख्यमंत्री
अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण माझं मत आहे की निवडणूक आयोगाने निवडणुका रद्द केल्यात ते पूर्णपणे चूक आहे. प्रामाणिकपणे निवडणुका लढणाऱ्या उमेदवारांवर हा अन्याय आहे. उद्या निवडणूक आणि आज तुम्ही निवडणुका रद्द करता. त्यामुळे त्यांचे श्रम वाया गेले. आता 15-20 दिवस त्यांनी पुन्हा प्रचार करायचा. या संदर्भाचं रिप्रेझेंटेशन आम्ही निवडणूक आयोगाला नक्कीच देऊ की अशा पद्धतीने निवडणुका रद्द करणे अत्यंच चुकीचे आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
(नक्की वाचा- नियमभंग, असभ्य वर्तन, सामान अडवलं… पुण्यात रात्रीच्या वेळी लेखिकेला Uber चालकाचा भयानक अनुभव)
कोणत्या निवडणुका पुढे ढकलल्या?
अमरावती विभाग
- बाळापूर
- अंजनगाव सुर्जी
- यवतमाळ
- देऊळगाव राजा
- वाशिम
कोकण विभाग
- अंबरनाथ
छत्रपती संभाजीनगर विभाग
- फुलंब्री
- धर्माबाद
- मुखेड
- रेणापूर
- वसमत
नागपूर विभाग
- घुग्घूस
- देवळी
नाशिक विभाग
- देवळाली-प्रवरा
- कोपरगाव
- पाथर्डी
- नेवासा
पुणे विभाग
- बारामती
- फुरसुंगी-उरळी देवाची
- महाबळेश्वर
- फलटण
- मंगळवेढा
- अनगर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world