जाहिरात

Nagpur News : सीमेवरील तणावामुळे नागपूर शहरातील पेट्रोल डिझेल ग्राहकांपुढील संकट तात्पुरते टळले

10 तारीख उलटून गेली तरी नागपूर येथील पेट्रोल डिझेल पंपांवर सर्वकाही सुरळीत सुरू आहे आणि ऑनलाईन पेमेंट्स स्वीकारले जात आहेत.

Nagpur News : सीमेवरील तणावामुळे नागपूर शहरातील पेट्रोल डिझेल ग्राहकांपुढील संकट तात्पुरते टळले

संजय तिवारी, प्रतिनिधी

विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन तर्फे 10 मे पासून ऑनलाइन पेमेंटवर बंदी टाकण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र सीमेवरील तणावामुळे आपल्या निर्णयाला स्थगित देण्याचे आणि प्रस्तावित आंदोलन सुद्धा स्थगित करण्याचे पेट्रोल डिझेल पंप संचालकांच्या संघटनेने नंतर जाहीर केले. 10 तारीख उलटून गेली तरी नागपूर येथील पेट्रोल डिझेल पंपांवर सर्वकाही सुरळीत सुरू आहे आणि ऑनलाईन पेमेंट्स स्वीकारले जात आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पेट्रोलपंप चालकांना बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी आणि फसवणुकीला सामोरे जावे लागत होते. नागपूर जिल्ह्यात दोन, तीन प्रकरणांमध्ये पंपचालकांची बँक खाती गोठवली होती आणि नंतर ती खुली केली. त्यामुळे पंपचालकांची गैरसोय झाली होती. एकूणच व्यापारी वर्ग आणि सर्विस इंडस्ट्रीला सायबर घोटाळ्यातून सुरक्षित करण्याच्या दृष्टीने नॅशनल सायबर सिक्युरिटी पोर्टलने उचललेल्या कठोर उपाय योजनांचा फटका बसत आहे.

Nagpur: अवघ्या 45 मिनिटांंमध्ये लावला 5 वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा छडा, नागपूर पोलिसांची दमदार कामगिरी

नक्की वाचा - Nagpur: अवघ्या 45 मिनिटांंमध्ये लावला 5 वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा छडा, नागपूर पोलिसांची दमदार कामगिरी

पेट्रोलपंप चालकांकडून ऑनलाइन पेमेंट स्वीकारण्यास सुरुवात...

दरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या आवाहनाचा देखील प्रभाव सोडून आता पंपचालक ऑनलाइन पेमेंट स्वीकारत आहेत. विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची तात्पुरती माघार घेण्यात आली आहे. पंपावर ग्राहकांना ऑनलाइन पेमेंटने पेट्रोल व डिझेल खरेदी करता येत आहे. देशातील आर्थिक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारने देखील सर्व व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्यासाठी पंपचालकांना सूचना केल्या आहेत. त्यामुळेच डीलर्स असोसिएशनने ऑनलाइन पेमेंट पूर्ववत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्राहक आता पूर्वीप्रमाणेच आपल्या पसंतीच्या अॅप्सद्वारे सुरक्षितपणे पेट्रोलपंपांवर पेमेंट करू शकत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com