
संजय तिवारी, प्रतिनिधी
नागपूरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्यातील पथकाने रविवारी सायंकाळी अवघ्या पंचेचाळीस मिनिटांनी एका पाच वर्षीय मुलीच्या अपहरणाचा तपास लावून मुलीला सुखरूप सोडवून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
फिर्यादी महिलेचा पती शेतकरी असून महिला हिंगणा परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करते. रविवारी सायंकाळी 4 वाजता नागपूर शहरातील वर्धा रोड वरील तृप्ती हॉटेल जवळ ही 30 वर्षीय महिला आपल्या पाच वर्षीय मुलीला घेऊन बसची वाट पाहत होती. त्यावेळी, तिचा परिचित 29 वर्षीय सूर्या ऊर्फ मिलिंद बघेल तिथे आला. दोन वर्षापूर्वी ते एक हॉटेल मध्ये एकत्र काम करत होते. सुर्या हा ड्रग एडिक्ट असून त्याच्यावर हत्या आणि अन्य गुन्हे दाखल आहेत.
( नक्की वाचा : Nagpur News: मोठी बातमी: 'या' जिल्ह्यात पेट्रोल पंपावर ऑनलाईन पेमेट बंद! डीलर असोसिएशनचा निर्णय )
सुर्याने लहान मुलीशी बोलण्याच्या बहाण्याने तिला कडेवर घेतले आणि बोलत बोलत एका ऑटो मध्ये बसून निघून गेला. महिला आश्चर्यचकित होऊन पाहत राहिली. त्यानंतर सूर्याने तिला फोन करून 20 - 25 हजार रुपयांची मागणी केली. पैसे मिळाले नाही तर मुलीला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. मुलीला सोडवण्यासाठी खंडणी मागितली आणि बुट्टीबोरी येथे वीस हजार रुपये घेऊन येण्याबाबत सांगितले.
( नक्की वाचा : तरुणाशी Instagram वर मैत्री, घरी भेटायला बोलवलं आणि लिंग बदललं! धक्कादायक प्रकारामुळे पोलीसही हादरले )
बेलतरोडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तांत्रिक तपास सुरू केला आणि संबंधित सूत्रांकडून माहिती घेत अवघ्या पंचेचाळीस मिनिटांत लहान मुलीसह आरोपीला पकडण्यात यश मिळविले. मुलगी परत मिळताच महिलेच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. नागपूर पोलिसांच्या या दमदार कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world