जाहिरात

साहित्य क्षेत्रात 'एक हैं तो सेफ हैं' नाहीच; विद्रोहीच्या संयोजकांचा मराठी साहित्य संमेलनात सामील होण्यास नकार

गेल्या 18 वर्षात विद्रोही संमेलनाचे संयोजक कधीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाताच्या व्यासपाठीवर उपस्थित राहिले नाहीत.

साहित्य क्षेत्रात 'एक हैं तो सेफ हैं' नाहीच; विद्रोहीच्या संयोजकांचा मराठी साहित्य संमेलनात सामील होण्यास नकार
मुंबई:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात 'एक हैं तो सेफ हैं'चा नारा चांगलाच गाजला आहे. आता तोच कित्ता साहित्य संमेलनाचे आयोजकही गिरवताना दिसत आहेत. यंदा ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीला आयोजित केलं जात आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजकांना निमंत्रण देण्यात आलं आहे. गेल्या 18 वर्षात विद्रोही संमेलनाचे संयोजक कधीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाताच्या व्यासपाठीवर उपस्थित राहिले नाहीत. यंदाच्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे विद्रोही साहित्य संमेलनात गेल्याने मोठा गोंधळ उडाला होता. त्याची पार्श्वभूमी असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाताच्या आयोजकांनी विद्रोहींना निमंत्रण दिलं आहे. मात्र विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी मराठी साहित्य संमेलनास सहभागी होण्यास नकार दिला आहे. 

दिल्लीत काँग्रेसचा हात सोडणं केजरीवालांसाठी फायद्याचं आहे का? 4 मुद्द्यांमध्ये समजून घ्या!

नक्की वाचा - दिल्लीत काँग्रेसचा हात सोडणं केजरीवालांसाठी फायद्याचं आहे का? 4 मुद्द्यांमध्ये समजून घ्या!

दिल्लीत होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रण त्यांनी विद्रोहीच्या संयोजकांना दिले आहे. मराठी साहित्य महामंडळाचे ९८ वे साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणाप आहे. गेल्या १७ वर्षांपासून ज्या ठिकाणी महामंडळाचे संमेलन असते, त्याच दरम्यान विद्रोही साहित्य संमेलनातून विचार मांडले जातात. यंदाचे महामंडळाचे संमेलन दिल्लीत आहे, तर विद्रोही संमेलनाच्या आयोजनाबाबत डिसेंबर महिन्यात बैठक होणार आहे. महाराष्ट्रात मतभिन्नता आणि विचारभिन्नता असली तरी एकोपा असतो हे दाखवण्यासाठी दिल्लीच्या संमेलनातून एक पाऊल पुढे टाकावे, जात- धर्म या आधारावर महाराष्ट्राचे विभाजन करू पाहणाऱ्यांना संदेश द्यावा, या आशयाचे पत्र संमेलनाचे आयोजक संजय नहार यांनी विद्रोही साहित्य संमेलनाचे संयोजक किशोर ढमाले यांना पाठवून एक प्रकारे संमेलनात सहभागी होण्याचे निमंत्रणच दिले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

2024 मध्ये मराठी साहित्य संमेलनात झाला होता गोंधळ...
2024 च्या 97 व्या अखिल मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे विद्रोही साहित्य संमेलनाला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना विरोध करण्यात आला होता. विद्रोही साहित्य संमेलनात विद्रोही साहित्यिकांनी विरोध केल्याच्या प्रकार घडला होता. यंदाच्या वर्षी अमळनेरमध्ये ९७ वे अखिल बारतीय साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, तर याच ठिकाणी १८ वे विद्रोही साहित्य संमेलनाचंही आयोजन करण्यात आलं होतं.  


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com