जाहिरात

आईला रेकॉर्डिंग पाठवलं, नंतर मृत्यूला कवटाळलं; नववीतील विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

शाळेमध्ये वारंवार अपमानित केलं जात असल्याने आत्महत्या करत असल्याचे या मुलाने म्हटले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पालकांनी शाळा प्रशानाविरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे.

आईला रेकॉर्डिंग पाठवलं, नंतर मृत्यूला कवटाळलं; नववीतील विद्यार्थ्याचे टोकाचे पाऊल

- मनोज सातवी, पालघर

आईला व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवत नववीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये घडली आहे. शाळेमध्ये वारंवार अपमानित केलं जात असल्याने आत्महत्या करत असल्याचे या मुलाने म्हटले आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पालकांनी शाळा प्रशानाविरोधात आक्रमक भूमिका घेत कारवाईची मागणी केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या बोईसर येथे एका शाळकरी विद्यार्थ्याने आपल्या आईला व्हाट्सअप वर व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . शाळेत वारंवार अपमानित केले जात असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने रेकॉर्डिंगमध्ये म्हटलंय. टोकाचे पाऊल उचलणारा विद्यार्थी बोईसरमधील टीन्स वर्ल्ड कॉर्पोरेट स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या शिकत होता.

(नक्की वाचा - समुद्रात वेगाने फिरली अन् नेव्हीची स्पीड बोट थेट प्रवासी नौकेला धडकली, अपघाताचा Video समोर)

विद्यार्थी आणि शिक्षकांकडून आपल्या मुलाची छळ होत असल्याने त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचललं असून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी मृत मुलाच्या पालकांकडून करण्यात आले आहे . या घटनेनंतर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपासानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे बोईसर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com