
मनोज सातवी, पालघर: रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीपात्रात कार कोसळून मोठी दुर्घटना घडली. या भयंकर अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही अपघाताची बातमी ताजी असतानाच पालघरमधील चील्लार - तारापूर मार्गावरील नागझरी येथे एका मद्यधुंद हायवा चालकाने वाहन थेट पेट्रोल पंपामध्येच घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालघर जिल्ह्यात सध्या मुंबई वडोदरा एक्सप्रेसवे चे काम झपाट्याने सुरू आहे मात्र, या महामार्गाच्या कामासाठी असलेले मोठ मोठे हायवा ट्रक अतिशय बेदरकारपणे चालवले जात असल्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. चील्लार - तारापूर मार्गावरील नागझरी येथे भरधाव हायवा ट्रक थेट पेट्रोल पंपात घुसला आहे.
हा ट्रक चालक दारूच्या नशेत असल्याचा स्थानिकांनि आरोप केला असून, अपघात होताच ट्रक चालक घटना स्थानावरून फरार झाला आहे..
सुदैवानं ट्रकने पेट्रोल पंपावरील नोझलला धडक दिली नसल्याने मोठी जीवितहानी टळली. यावेळी ट्रक मालकाकडून स्थानिकांबरोबर अरेरावीची भाषा वापरून दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. पोलीस सध्या चालकाचा शोध घेत आहेत.
नक्की वाचा - Crime News: 21 वर्षीय विद्यार्थ्याचा रेल्वे रुळावर मृतदेह, आत्महत्या की घातपात? कुटुंबियांचे गंभीर आरोप
धुळे सोलापूर महामार्गावर अपघात, आईसह चिमुकल्याचा मृत्यू
धुळे -सोलापूर महामार्गावर सौंदलगाव जवळ भीषण अपघात झालाय.कार उलटून झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये दोन वर्षीय बाळासह एका महिलेचा समावेश आहे.तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. 29 वर्षीय रोहिणी चव्हाण आणि अडीच वर्षीय नूरवी चव्हाण या चिमुकलीचा मृत्यू झालाय.जखमीमध्ये दोन पुरुषांसह तीन महिला आणि एका बाळाचा समावेश आहे.
दुसरीकडे, रत्नागिरीमधून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रस्त्यालगत दुचाकीच्या बाजूला उभ्या असलेल्या महिलेला क्रेनने धडक दिल्याने महिला क्रेनच्या चाकाखाली चिरडून तिचा जागीच मृत्यू झाला. देवरुख-संगमेश्वर मार्गावरील कोसुंब येथे ही घटना घडली. सावित्री राजाराम सावंत असं या महिलेचं नाव आहे. याबाबत जयेंद्र गजानन सावंत यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
नक्की वाचा - Mumbai Goa Highway : वडिलांच्या अंत्यसंस्काराला लेक तातडीने निघाली, काळाने रस्त्यातच गाठलं; 5 जणांचा करूण अंत
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world