जाहिरात

Palghar News: 'मला वाचवा, भारतात यायचंय', पालघरच्या तरुणाची युरोपमध्ये फसवणूक, नोकरीसाठी नेलं अन्..

एजंटकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्याने मनसेचे तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधला असून व्हिडिओ कॉल द्वारे त्याने त्याची व्यथा मांडली आहे. 

Palghar News: 'मला वाचवा, भारतात यायचंय', पालघरच्या तरुणाची युरोपमध्ये फसवणूक, नोकरीसाठी नेलं अन्..

पालघर:  पालघर जिल्ह्यातील एका तरुण युरोपमध्ये नोकरीच्या आमिषाने नेऊन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उमेश किसन धोडी असे पीडित तरुणाचे नाव असून तो पालघरमधील बच्चू मिया चाळ येथे राहतो. येवढ्या मोठ्या कंपनीने आमचे मेडिकल इन्शुरन्स का काढले नाहीत याची विचारना केल्यामुळे, आपल्यावर खोटे आरोप करून कंपनीने कामावरून टाकले आहे. तर एजंट कडून जीवे मारण्या च्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे त्याने मनसेचे तुलसी जोशी यांच्याशी संपर्क साधला असून व्हिडिओ कॉल द्वारे त्याने त्याची व्यथा मांडली आहे. 

उमेश याला वडोदरा येथील IOR कंपनीच्या माध्यमातून युरोपमधील अल्बानिया या देशात "अमेक सोल्युलर ग्रुप" या कंपनीमध्ये नोकरी देण्यात आली होती. मात्र, कंपनीकडून नियमांनुसार कोणतीही सुविधा न मिळाल्याने त्याने आक्षेप घेतला असता, त्याला तिथून कामावरून काढण्यात आले. IOR कंपनीचा एजंट रफिक घाची याने युरोपमध्ये चांगली नोकरी देतो असे सांगून उमेशची फसवणूक केली आणि त्याला परदेशात पाठवले. सध्या उमेश युरोपमध्ये अडचणीत असून त्याने व्हाट्सअप व्हिडीओद्वारे मदतीची कळकळीत विनंती केली आहे.

VIDEO: माधुरी हत्तीणवरुन हिंदुस्थानी भाऊची शिवीगाळ, ठाकरेंच्या नेत्याने दिला कोल्हापुरी पायतणाने चोपण्याचा इशारा

माझ्यावर खोटे आरोप करुन कंपनीमधून काढण्यात आलं आहे. एजेंटकडून धमक्या येत आहेत. माझा छळ केला जात आहे. या देशात कसला कायदा नियम नाही. मी बाथरुमध्ये लपून बसतोय. मला माझा रिफंड द्यावा आणि माझी सुटका व्हावी. मला भारतात यायचं आहे. हा व्हिडिओ एसपी साहेब देशमुख यांच्यासोबत पोहोचवा, अशी विनंती या तरुणाने केली आहे. 

या प्रकारामुळे परदेशात नोकरीच्या शोधात जाणाऱ्या तरुणांना योग्य माहिती आणि खात्रीशीर एजंटची निवड करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. उमेशच्या मदतीसाठी प्रशासन आणि परराष्ट्र मंत्रालयाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे.

Cloud burst video: संपूर्ण गावाला नदीनं गिळलं, ढगफुटीची दृश्य पाहून काळीज थरथरलं, पाहा Video

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com