जाहिरात
This Article is From Jun 03, 2024

पंढरपुरात दोन वाहनांचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

पंढरपूर येथील सांगोला मार्गावर रविवारी (2 जून) रात्री कार आणि बाइकचा भीषण अपघात झाला.

पंढरपुरात दोन वाहनांचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू

Sangola Accident: पंढरपूर येथील सांगोला मार्गावर रविवारी (2 जून) रात्री भीषण अपघात झाला आहे. कार आणि बाइकची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय. बामणी गावाजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यानंतर कारची बाइकला जोरदार धडक बसली.   

(नक्की वाचा: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी)

मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू

अपघातात बाइकवरील तिघेही जण खाली कोसळले आणि त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यानं तिघांचाही मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी रुग्णालयात पाठवले.  

धीरू कोळेकर, विठ्ठल दिवटे आणि म्हाळप्पा धनगर अशी मृत पावलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही जण निपाणी तालुक्यातील चिकोडी जिल्ह्यातील रहिवासी होते. दरम्यान कार चालक दशरथ गटकुळ हा  फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातामुळे पंढरपूर सांगोला मार्गावरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

(नक्की वाचा: Toll Charges Hike: सर्वसामान्यांच्या खिशावर ताण, निवडणुका संपताच टोल दरात मोठी वाढ)

समृद्धी महामार्गावरही अपघात तिघांचा मृत्यू 

दुसरीकडे वाशिमच्या समृद्धी महामार्गावरील नागपूर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने येणाऱ्या भरधाव कारने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये कार चालकासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मालेगावमधील रिधोरा इंटरचेंज परिसरात ही घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारच्या पुढील सीटवर बसलेला चालकासह आणखी एकाचा मृतदेह कारमध्येच अडकला होता. 

(नक्की वाचा: ओडिशात 24 तासात उष्माघातामुळे 45 जणांचा मृत्यू? देशाचा आकडा 211 वर)
VIDOE: भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, सांगोला-पंढरपूर मार्गावर घडला प्रकार; कारचालक फरार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: