जाहिरात

'...तर विठ्ठलाची मूर्ती टिकणार नाही'; वारकरी संप्रदायाने व्यक्त केली भीती, नव्या वादामुळे भाविक चिंतेत

महाराष्ट्राचं अराध्य दैवत आणि अख्ख्या जगताची माऊली असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीचा नवा वाद समोर आला आहे.

'...तर विठ्ठलाची मूर्ती टिकणार नाही'; वारकरी संप्रदायाने व्यक्त केली भीती, नव्या वादामुळे भाविक चिंतेत

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Pandharpur News : महाराष्ट्राचं अराध्य दैवत आणि अख्ख्या जगताची माऊली असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीचा नवा वाद समोर आला आहे. भाविकांसाठी विटेवर उभी असलेली विठ्ठलाची मूर्ती पाहताच भाविकांचा ऊर भरून येतो आणि डोळ्यात पाणी तरळतं. हजारो वर्षे जुनी ही मूर्ती जर्जर झाली असून तिच्या लेपनावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. विठ्ठल मूर्तीवरील लेपणाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी प्रशासन विरुद्ध वारकरी संप्रदाय आमने - सामने आले आहेत. 

काय आहे वाद? 

विठ्ठल मूर्तीच्या जतन आणि संवर्धनाबाबत आज पंढरपुरात बैठक झाली. यामध्ये मूर्तीवर रासायनिक लेपन प्रक्रिया करण्याची  सूचना पुरातत्व विभागाकडून ठेवण्यात आली आहे. मात्र वारकरी संप्रदायाकडून पारंपरिक आयुर्वेदिक वज्रलेप करण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. याबाबत वारकरी संप्रदायातील अभ्यासक मंडळी यांनी विठ्ठल मूर्तीची पाहणी केली आहे. बडव्यांच्या ताब्यात विठ्ठल मंदिर असताना आयुर्वेदिक लेपन पद्धती होत होती. अशीच लेपन पद्धती मूर्तीवर संवर्धनासाठी करावी. अशी मागणी वारकरी सांप्रदायाकडून करण्यात आली आहे. रासायनिक लेपणामुळे मूर्तीची झीज होते. त्यामुळे मूर्तीच्या संवर्धनाची गरज असल्याचं पुढं येत आहे. विशेष म्हणजे विठ्ठल मूर्तीचे स्कॅनिंग करण्याबाबतची सूचनाही पुरातत्व विभाकडून पुढे आली आहे. एकंदर विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनासाठी आता प्रशासनाचा रासायनिक लेप तर वारकरी संप्रदायाच्या आयुर्वेदिक लेपन अशा दोन मुद्द्यांमुळे नवा वाद रंगताना दिसत आहे. 

नक्की वाचा - Akola News : पतीला पाठीवर घेत रुग्णालयात धावाधाव; व्हायरल प्रकरणातील महिलेचा धक्कादायक खुलासा, रुग्णाला ICU...

पारंपरिक लेपन प्रक्रियेसाठी वारकरी संप्रदाय आग्रही आहे. जर या मूर्तीवर वारंवार रासायनिक प्रक्रिया होत राहिल्या तर १०० टक्के ही मूर्ती टिकणार नाही, अशी भीती वारकरी संप्रदायाकडून व्यक्त केली जात आहे. पुरातत्व खात्याने या शिल्पकलेचं जतन भारतीय पद्धतीने कसं होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. पुरातत्व विभागाच्या रासायनिक प्रक्रिया लेपणास वारकरी संप्रदायाचा विरोध आहे, वेळप्रसंगी न्यायालयात जाणार असल्याचा इशारा वारकरी संप्रदायाकडून देण्यात आला आहे. 

आयुर्वेदिक आणि रासायनिक लेपण प्रक्रियेत काय आहे फरक?

मिळालेल्या माहितीनुसार, आयुर्वेदिक लेपणासाठी शंखाचं पाणी, शिलाची पावडर, बेलाचा रस यांसारख्या २७ घटकांचा समावेश असतो. तर केमिकलमध्ये सँड पावडरसह अनेक केमिकल वापरले जातात.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com