जाहिरात

Panvel Land Scam: पनवेलमध्ये बेकायदेशीररीत्या जमीन हडपली, तब्बल 1.24 कोटींची फसवणूक

दोन आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Panvel Land Scam: पनवेलमध्ये  बेकायदेशीररीत्या जमीन हडपली, तब्बल 1.24 कोटींची फसवणूक

नवी मुंबई: नवी मुंबई पनवेल तालुक्यातील मौजे वाघाचीवाडी परिसरात एका ज्येष्ठ व्यक्तीच्या मालकीची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या हस्तगत करून सुमारे ₹1.24 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी दोन आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ऑगस्ट 2015 ते मार्च 2024 या काळात घडली असून, पीडिताने सादर केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम 419, 420, 465, 467, 468, 471 व 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Sharad Pawar: 'हिंदीची सक्ती नको, पण....', शरद पवार यांचे मोठे विधान

काय आहे नेमक प्रकरण?

फिर्यादी संजय चंद्रकांत महागावकर (वय 69, रा. आनंद, गुजरात) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पनवेल तालुक्यातील वाघाची वाडी गावातील गट क्रमांक ८/३/५८ मधील प्लॉट क्र. 13 व सब प्लॉट नं. 2, क्षेत्रफळ 0.11.00 हेक्टर्स इतकी जमीन त्यांच्या व त्यांच्या मयत आई निला चंद्रकांत महागावकर यांच्या नावावर होती. मात्र आरोपी क्रमांक 1 प्रभाकर बंडु नाईक (रा. डेरवली, ता. पनवेल) व आरोपी क्रमांक 2अंबावी रणछोड पटेल (रा. वाशी, नवी मुंबई) यांनी संगनमत करून मोठ्या शिताफीने या जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार केली.

Amit Shah : देशात इंग्रजी बोलणाऱ्यांना लवकरच लाज वाटेल, अमित शाह असं का म्हणाले?

बनावट कागदपत्रांचा वापर

या आरोपींनी तृतीय व्यक्तीस फिर्यादीच्या जागी उभे करून त्यांच्याऐवजी खोटी सह्या केल्या. इतकेच नव्हे तर बनावट ओळखपत्रे, निवडणूक आयोगाचे बनावट दस्तऐवज व खोटे खरेदीखत तयार करून सदरची मालमत्ता आरोपी क्रमांक 1व 2 यांच्या नावावर करून घेतली. नंतर त्यांनी ती मालमत्ता तिसऱ्या व्यक्तीला विकून सुमारे ₹1.24 कोटींचा आर्थिक फायदा करून घेतला. या प्रकरणात आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. मात्र पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) यांच्याकडून परवानगी घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार हे करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com