
Maharashtra Rain Latest Update : मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाने झोडपले असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: मराठवाड्यात धो धो पाऊस बरसल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा जिल्ह्यात पावसाची बॅटिंग सुरुच आहे. तसच वाशिम, नाशिक, ठाणे, रायगडसह मुंबईतही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातल्याने रस्त्यांवर सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. तसच काही ठिकाणी वीजेचा लपंडावही सुरु झाला आहे. परभणी जिल्ह्यातही पावसाचा हाहा:कार सुरु असून जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. या धरणातून 56060.53 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु असून नजीकच्या गावांचा संपर्क तुटला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाचे दरवाजे उघडल्याने जिंतूर-सेनगाव रस्ता बंद करण्यात आला आहे. येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे खडकपूर्णा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, येलदरी धरणाचे गेट क्रं 1,3,5,6,8 आणि 10,तसंट गेट क्रं 2,4,7 मधूनही पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. या दरवाज्यांमधून 56060.53 क्युसेक्स (1587.01 Cumec) इतका विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये पुन्हा पूरसदृष्य स्थिती निर्माण होईल का? असा सवाल येथील ग्रामस्थांना पडला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्येही पावसाची जोरदार बॅटिंग
छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश नद्यांना पूर आला आहे. तालुक्यातील हडस पिंपळगाव शिवारात असलेल्या ढेकू नदीलाही मोठा पूर आला आहे. या नदीच्या पुराच्या पाण्यात गणपत त्र्यंबक निघोटे (80) हे वृद्ध शेतकरी अडकले होते.त्यानंतर बचाव पथकाने शर्थीचे प्रयत्न करून या वृद्ध शेतकऱ्याला पूराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
नाशिकमध्येही पावासाने घातलाय धुमाकूळ
नाशिकच्या गोदावरीचा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पाणी थेट
भांडी बाजारांमध्ये शिरलं असून व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गंगापूर धरणातून तब्बल 9857 क्युसेस विसर्ग केल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याचं समोर आलंय.
https://www.youtube.com/watch?v=KcMnh08c7wU
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world