जाहिरात

महाराष्ट्राहून 3000 KM दूर कार्यकर्त्याच्या पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगर; संपूर्ण भाजप कुटुंब मदतीला धावलं!

पालघर जिल्ह्यातील मोखाडा गावात राहणारे भाजपचे जिल्हा सचिव विठ्ठल दगडू पाटील यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अशावेळी काय करावं हे त्यांच्या पत्नीला उमजत नव्हतं.

महाराष्ट्राहून 3000 KM दूर कार्यकर्त्याच्या पत्नीवर कोसळला दु:खाचा डोंगर; संपूर्ण भाजप कुटुंब मदतीला धावलं!
मुंबई:

Palghar News : पालघर जिल्ह्यातील मोखाडा गावात राहणारे भाजपचे जिल्हा सचिव विठ्ठल दगडू पाटील यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अशावेळी काय करावं हे त्यांच्या पत्नीला उमजत नव्हतं. कोणाची मदत घ्यावी हे कळत नव्हतं. त्या दुसऱ्या राज्यात होत्या. अशा कठीण समयी संपूर्ण भाजप कुटुंब त्यांच्यासोबत उभं राहिलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण परिस्थिती सांभाळली आणि विठ्ठल पाटील यांची पत्नी वंदना यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या.

शेकडो किलोमीटर दूर अनोखळी राज्यात वंदन एकट्या...

विठ्ठल पाटील पत्नी वंदना पाटील हिच्यासह अरुणाचल प्रदेशच्या प्रवासाला गेले होते. प्रवास व्यवस्थित सुरू होता. दोघेही तवांगमध्ये थांबले होते. ६ जून, शनिवारी सकाळी साधारण ७.३० वाजता अचानक विठ्ठल दगडू यांची तब्येत बिघडली. पत्नी वंदनाने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. शेकडो किलोमीटर दूर, एका अनोखळी राज्यात वंदना एकट्या होत्या. सोबत पतीचं पार्थिव. भाषा कळत नव्हती, लोक अनोखळी होते आणि संसाधन सीमित होते. अशावेळी पतीचा मृतदेह आपल्या गावी कसा घेऊन जावा हा त्यांच्यासमोरील मोठी प्रश्न होता. 

नक्की वाचा - Mumbai News : IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची धडाकेबाज कारवाई; आता महिलांच्या सर्वात प्रिय पदार्थावर FDA ची नजर 

बीजेपी के जिला सचिव विठ्ठल दगडू पाटील का निधन

भाजपचे जिल्हा सचिव विठ्ठल दगडू पाटील यांचं निधन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांभाळली परिस्थिती...

या संकटसमयी वंदान यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आठवण आली. ओळखीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्यांनी दोघांना मेसेज पाठवला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी कार्यालयाला आदेश सर्व सर्वतोपरी मदतीचे आदेश दिले. रात्री उशीरापर्यंत महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या अधिकाऱ्यांमध्ये संवाद सुरू होता. 


५०० किलोमीटर आणि १५ तासांचा कठीण डोंगराळ प्रवास...

अरुणाचल प्रदेश सरकार आणि स्थानिक प्रशासन सक्रिय झाला. तवांग ते गुवाहाटीपर्यंत साधारण ५०० किलोमीटर आणि १५ तासांचा कठीण डोंगराच प्रवास रुग्णवाहिकेच्या मदतीने पूर्ण केला. यानंतर पतीच्या मृतदेहासह वंदना एकट्या जाऊ नये यासाठी एक महिला कर्मचारीही त्यांच्यासोबत नियुक्त करण्यात आली. यानंतर गुवाहाटी पोहोचताच आसाम सरकार आणि प्रशासनाने पुढील व्यवस्था सांभाळली. विमान कंपनीकडून विशेष परवानगी घेत विठ्ठल पाटील यांचं पार्थिव मुंबईला पाठविण्याची व्यवस्था केली. वंदना यांचंही विमान तिकीट काढण्यात आलं. वंदना या दुपारी पतीच्या पार्थिवासह मुंबईत पोहोचल्या. मुंबईहून त्यांच्या गावापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com