सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:
Pimpri Chinchwad Crime: शासकीय यंत्रणांकडून होणारी वारंवारची छापेमारी आणि अधिकाऱ्यांकडून होणारी आर्थिक पिळवणूक याविरोधात पिंपरीतील व्यापाऱ्यांनी आता थेट आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. ही जाचवणूक न थांबल्यास दररोज १०० कोटींची उलाढाल असलेली शहरातील मुख्य बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
Vasai Virar Water Cut: महापालिकेचा मोठा शटडाउन! वसई-विरारमध्ये 7 दिवस पाणीबाणी; कधी अन् कुठे? वाचा..
पिंपरी चिंचवडमध्ये व्यापारी आक्रमक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी चिंचवडच्या मध्यवर्ती भागात राज्यातील कापड आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी रोजची उलाढाल सुमारे १०० कोटींच्या घरात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विविध शासकीय यंत्रणांकडून या ठिकाणी सातत्याने छापेमारी केली जात आहे. कॉपीराइट कायद्याचा आधार घेऊन कारवाई करण्यासाठी येणारे अधिकारी व्यापाऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा गंभीर आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.
बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा
व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कॉपीराइट कायद्यांतर्गत कारवाई करताना जर कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तरतूद नाही. असे असतानाही पोलीस बळाचा वापर करून व्यापाऱ्यांना धमकावले जात आहे. तर पोलीस आयुक्तांनी अशा छापेमारीसाठी कोणताही पोलीस बंदोबस्त देऊ नये, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, जर प्रशासनाने या छळाची दखल घेतली नाही, तर सर्व व्यापारी रस्त्यावर उतरतील आणि बाजारपेठ अनिश्चित काळासाठी बंद ठेवली जाईल अस ही व्यापारी संघटनांनी म्हटले आहे. व्यापाऱ्यांच्या या इशाऱ्यावर आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world