जाहिरात

PMC Election: ...म्हणून अजित पवारांकडून आंदेकरांना तिकीट; पुणेकरांसाठी व्हिजन काय? वनराजच्या लेकीने दिलं उत्तर

Pune Election 2026: अजित पवारांनी आंदेकर कुटुंबामध्ये तिकीट का दिलं? याबाबत आता कुटुंबातील सदस्यांनीच महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

PMC Election: ...म्हणून अजित पवारांकडून आंदेकरांना तिकीट; पुणेकरांसाठी व्हिजन काय? वनराजच्या लेकीने दिलं उत्तर

रेवती हिंगवे, पुणे:

Pune Municiple Corporation Election 2026:  पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पुण्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना तिकीट दिल्याने अजित पवार यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून आयुष कोमकर हत्या प्रकरणात सध्या तुरूंगात असलेल्या बंडू आंदेकरसह तिघांना उमेदवारी दिली आहे. सध्या आंदेकर कुटुंबाकडून नेकी का काम, आंदेकर का नाम म्हणत जोरदार प्रचार सुरु आहे. मात्र अजित पवारांनी आंदेकर कुटुंबामध्ये तिकीट का दिलं? याबाबत आता कुटुंबातील सदस्यांनीच महत्त्वाचा खुलासा केला आहे. 

अजित पवारांनी का दिली उमेदवारी?

"आमच्या कुटुंबातील तिघांना दादांनी उमेदवारी दिली, त्याबद्दल धन्यवाद. याआधीही उदयकांत आंदेकर यांना २०१२ मध्ये दादांनी उमेदवारी दिली होती. आम्ही पिढ्यानपिढ्या काम करत आलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही मनापासून करत आलो आहोत. अजित पवार यांच्या हाताखाली काम करत त्यांची कामे पाहत आलो आहोत. त्या कामांमुळेच अजित दादांनी आत्ताची ही संधी दिली आहे," असं आंदेकर कुटुंबातील महिला सदस्यांनी सांगितले आहे. 

Amravati Politics: बंडखोरांना दणका! अमरावतीत भाजपची सर्वात मोठी कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ

"मी लहान असल्यापासून माजी आजी राजश्री आंदेकर, उदयकांत आंदेकर आणि पप्पांना सतत लोकांसाठी काम करताना पाहिलं आहे. माझ्या घरातही पहिल्यापासून तेच वातावरण राहिलं आहे. मी सर्वांना नेहमीच लोकांच्या मदतीला जाताना पाहिले आहे. त्याचा परिणाम आम्हाला प्रचारामध्ये दिसत आहे. लोक स्वतःहून केलेली कामे सांगत आहेत," असं म्हणत वनराज आंदेकरची लेक रिया आंदेकरने वडिलांचा प्रचार जोरात असल्याचे सांगितले आहे. 

गुन्हेगारी थांबवण्यासाठी प्रयत्न..

तसेच "वनराज आंदेकर यांचे जे स्वप्न अपूर्ण राहिले आहे ते आम्ही पूर्ण करणार आहे. मतदारांचे प्रश्न सोडवणार आहे. आणखी कोणत्या उपाययोजना करण्यात येतील त्या पाहून तशी कामे करणार आहोत. तसेच आमच्या कुटुंबातील सदस्यांवर असलेले कोणतेही गुन्हे, आरोप सिद्ध झाले नाहीत. खोट्या आरोपांचा न्यायालय निकाल देईल. आम्ही ज्या पद्धतीने राजकीय क्षेत्रात काम करत आहोत, त्यामुळे ही गुन्हेगारी थांबली पाहिजे यासाठी प्रयत्न करत राहू," असंही वनराज आंदेकरच्या वहिनीने सांगितले आहे. 

Bhimashankar : पुण्यातील भीमाशंकर ज्योर्तिलिंग 3 महिने बंद राहणार, महाशिवरात्रीला मंदिर खुलं असेल की बंद? 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com