प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा चौकशी अहवाल समोर आला आहे. हा अहवाल राज्य सरकारने केंद्राकडे सादर केला आहे. या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आठवड्याच्या चौकशीनंतर अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गराडे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य सरकारचा सामान्य प्रशासन विभाग पूजा खेडकर यांच्याबाबत अहवाल तयार करत होता. केंद्र सरकारने स्थापन केलेल्या एक सदस्यीय समितीलाही या अहवालाची प्रत पाठवण्यात आली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा अहवाल खेडकर यांनी सेवांमध्ये रुजू होण्यापूर्वी केलेल्या विविध दाव्यांची सत्यता तपासण्यासाठी केला गेला आहे. यामध्ये त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्रे याचा समावेश आहे. या आधारेच त्यांनी ओबीसी आणि पीडब्ल्यूबीडी कोट्याचे फायदे मिळवले होते. त्याच बरोबर त्यांच्या आई-वडिलांची पार्श्वभूमीही या अहवालात समाविष्ट करण्यात आली आहे.
ट्रेंडिंग बातमी - विधानसभेच्या तयारीला सुरूवात, काँग्रेस पक्षाच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका
पूजा यांचे वडील हे निवृत्त अधिकारी आहेत. दिलीप खेडकर असं त्यांचे नाव आहे. त्यांनी निवडणुकही लढवली होती. त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये आहे. असं असताना त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असल्याचा पूजा यांचा दावा आहे. याबाबतही या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे.
नक्की वाचा - ठरलं तर मग! जागांसाठी शिवसेना आक्रमक, मित्रपक्षांचे टेन्शन वाढले
पूजा यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही. त्याबाबतचे ही प्रमाणपत्र आरटीओने दिले आहे. शिवाय पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात असताना त्यांच्या असभ्य वर्तनाचाही या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. त्याच बरोबर त्या ज्या ऑडीमध्ये कामावर जायच्या त्यामध्ये लाल निळा झेंडा होता. राज्य सरकारचे चिन्ह होते. त्याचबरोबर ऑडीच्या वापरावरून त्यांचा एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी वादही झाला होता. याचा उल्लेख या अहवालात आहे. पुण्यात त्यांनी किती वेळ काम केले. त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या केबिनवर दावा कसा केला. त्यांची वैयक्तिक कार अधिकृत कामांसाठी कशी वापरली याचाही उल्लेख अहवालात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world