जाहिरात

विधानसभेच्या तयारीला सुरूवात, काँग्रेस पक्षाच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका

काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत या बैठका पार पडणार आहेत.

विधानसभेच्या तयारीला सुरूवात, काँग्रेस पक्षाच्या आज 2 महत्त्वाच्या बैठका

काँग्रेस पक्षाच्या आज दोन महत्त्वाच्या बैठका पार पडणार आहे. आज सकाळी 10 वाजता काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून दुपारी 2 वाजता आमदार आणि कार्यकारिणीसोबत बैठक पार (Congress party meeting today) पडणार आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत या बैठका पार पडणार आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठका घेतल्यात असल्याची माहिती आहे. लोकसभेत महाराष्ट्रात काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे विधानसभेसाठीही जबाबदारी वाढली आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेते कामाला लागले असून मविआमधील जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडविणं त्यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल. 

नक्की वाचा - ठरलं तर मग! जागांसाठी शिवसेना आक्रमक, मित्रपक्षांचे टेन्शन वाढले

आज सर्वात आधी प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार असून ज्यात आगामी विधानसभेसाठी जागा वाटपावर चर्चा केली जाणार आहे. लोकसभेत काँग्रेस पक्षाच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या, त्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष हाच मोठा भाऊ असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. आगामी विधानसभेत देखील सर्वाधिक जागा काँग्रेसच्या असतील आणि त्या जागा कोणत्या असतील यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे. दुसरी बैठक दुपारी 2 वाजता कार्यकारिणीसोबत असणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. त्यामुळे 
या 7-8 आमदारांवर नेमकी काय कारवाई करायची, हे या बैठकीत ठरवलं जाणार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com