मुंबई कोस्टल रोड प्रकल्प आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार आहे. या कोस्टल रोडच्या नव्या मार्गिकेमुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास केवळ 15 मिनिटांत करता येणार आहे. मुंबई कोस्टल रोड दररोज सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत वाहनांसाठी खुला असेल. कोस्टल रोड, वरळी-वांद्रे सी लिंक मार्गे पश्चिम द्रुतगती महामार्ग अर्थात वेस्टर्न हायवेवरुन मुंबईकरांना मरिन ड्राइव्ह ते दहिसरपर्यंत सिग्नल फ्री प्रवास करता येणार असल्याने हे फायदेशीर ठरेल. दुसरीकडे सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटक केलेल्या आरोपीचे हाताचे ठसे आणि सैफ अली खानच्या घरातून घेतलेले ठसे जुळले नाहीत, त्यामुळे आता रक्ताचे नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत.
Live Update : राष्ट्रपती झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि PM मोदींमध्ये पहिल्यांदाच चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच त्यांची पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली आहे. दोन्ही देशांच्या प्रमुखांना परस्पर संबंध बळकट करण्यावर चर्चा केली.
PM मोदी यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती दिली आहे.
Delighted to speak with my dear friend President @realDonaldTrump @POTUS. Congratulated him on his historic second term. We are committed to a mutually beneficial and trusted partnership. We will work together for the welfare of our people and towards global peace, prosperity,…
— Narendra Modi (@narendramodi) January 27, 2025
MSRTC News: एसटी भाडेवाढीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता, सुत्रांची माहिती
राज्य परिवहन महामंडळाच्या भाडेवाडीच्या निर्णयावरुन नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. अशातच आता हा निर्णय मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांच्या नाराजीमुळे एसटीने केलेल्या भाडेवाढीचा निर्णय मागे घेण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
Anjali Damania: धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याबाबत अजित पवार सकारात्मक: अंजली दमानिया
२५ मिनीटे आमची भेट झाली त्यांचे म्हणणे होते की बीडमध्ये झालेलं काळीमा फासणारं कृत्य आहे त्याचं मी समर्थन करत नाही. आज मी त्यांना दाखवलं की कसं धनंजय मुंडेंचे एकत्र बिझनेस आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत. त्यासाठी त्यांना मी सर्व कायदेशीर बाबी दाखवल्या.. ज्यामध्ये सरळसरळ लिहलं आहे की कुठलाही नेता आर्थिक नफा मिळवू शकत नाही. त्यानंतर त्यांचे सो कॉल्ड दहशतवादी समर्थकांचे रिल्स व्हिडिओ दाखवले.
Accident News: मोर्शी-वरूड महामार्गावर भीषण अपघात, 1 मृत्यू, 12 प्रवासी जखमी
मोर्शी-वरूड महामार्गावर भीषण अपघात..
अपघातात एका महिलेचा मृत्यू
मोर्शी-वरूड महामार्गावर भीषण अपघातात टवेरा गाडी पलटी; 12 प्रवासी जखमी, 5 गंभीर
मोकाट जनावर समोर आल्याने चालकाचा ताबा सुटला..
मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू, गंभीर जखमींना अमरावती जिल्हा रुग्णालयात हलवले...
Accident News: मोर्शी-वरूड महामार्गावर भीषण अपघात, 1 मृत्यू, 12 प्रवासी जखमी
मोर्शी-वरूड महामार्गावर भीषण अपघात..
अपघातात एका महिलेचा मृत्यू
मोर्शी-वरूड महामार्गावर भीषण अपघातात टवेरा गाडी पलटी; 12 प्रवासी जखमी, 5 गंभीर
मोकाट जनावर समोर आल्याने चालकाचा ताबा सुटला..
मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू, गंभीर जखमींना अमरावती जिल्हा रुग्णालयात हलवले...
Anjali Damania Meet Ajit Pawar: अंजली दमानिया अजित पवारांच्या भेटीला, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांच्या देवगिरी या बंगल्यावर अंजली दमानिया पोहोचल्या असून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा.. याबाबतचे पुरावे दाखवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Manoj Jarange Patil Protest: खासदार डाॅ.कल्याण काळे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला
जालनाचे खासदार डाॅ.कल्याण काळे आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला: मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण भेटावे या मागणीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसलेला आहे.
आज अंतरवाली सराटीत काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे भेटीला आले असून जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करत आहेत
Solapur News: सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का, बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर
- सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का
- शरद पवार गटाचे ओबीसी नेते आणि मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दोन दिवसात पक्ष प्रवेशाची शक्यता
- रमेश बारसकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तीन वेळा भेट घेतलीय
- रमेश बारसकर यांच्यासोबत 3 माजी नगरसेवक, दोन सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते करणार प्रवेश
- रमेश बारसकर मागील अनेक वर्षापासून राष्ट्रवादी शरद पवार गटात ओबीसी नेते म्हणून कार्यरत होते
- मात्र लवकरच ते आपल्या समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता
Jansthan Award 2025: यंदाचा जनस्थान पुरस्कार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर
- यंदाचा जनस्थान पुरस्कार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर
- जनस्थान हा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा मानाचा पुरस्कार
- सतीश आळेकर यांची मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळख
- 10 मार्च रोजी नाशिकच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये पार पडणार सोहळा
- एक लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप
Anjali Damania Meet Ajit Pawar: अंजली दमानिया सात वाजता घेणार अजित पवारांची भेट
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या.. अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलीा आहे. याच संदर्भात त्या आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून अजित पवारांनी त्यांना वेळ दिली आहे.
Kalyan News: पोलीास स्टेशनसमोरच तरुणाचा जीवघेणा स्टंट, बघ्यांची गर्दी
कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने पोटासाठी जीवघेणा स्टंट केला आहे. ए. एस .रोशन असे या तरुणाचे नाव आहे. कल्याणमधील मोहने परिसरात लहुजी मैदान आहे. या मैदानाचा मधोमध एक सिमेंटच्या चबुतरा बनवला. या बंदिस्त चबुतराच्या आत रोशन यांने स्वतःला बारा तास कोंडून घेतले. पोलिसांसमोर हा चबुतरा उघडण्यात आला आणि त्यातून रोशन हा जिवंत बाहेर आला. काही महिलांनी त्याचा सत्कार केले. हा खेळ बघण्यासाठी एकच लोकांची गर्दी होती.
Solapur News: सोलापुरात आढळले आणखी दोन जीबीएस रुग्ण
सोलापुरात आढळले आणखी दोन जीबीएस रुग्ण
- सोलापूर शहरात आढळले दोन जीबीएस संशयित आजाराचे रुग्ण
- शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांवर उपचाराला सुरुवात
- सोलापूर शहरात एका खाजगी रुग्णालयात कालच एका जीबीएस संशयित रुग्णाचा झाला होता मृत्यू
- GBS संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित आम्हाला कळवावे महापालिका प्रशासनाने खाजगी रुग्णालयांना केले आवाहन
- पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असताना सोलापुरात देखील दोन संशयित रुग्णसमोर
Live Update : शिवसेना शिंदे गटाचा डहाणूचा पदाधिकारी मागील आठ दिवसांपासून बेपत्ता
शिवसेना शिंदे गटाचे डहाणूचे पदाधिकारी अशोक धोडी मागील आठ दिवसांपासून बेपत्ता आहेत. डहाणू विधानसभा समन्वयक अशोक धोडी यांचं अपहरण झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून आठ दिवसांपासून पोलीस ठाण्यात फेऱ्या मारून देखील पोलिसांनी योग्य तपास सुरू न केल्याचा धोडी कुटुंबाचा आरोप आहे. अशोक धोडी हे गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमा वादावर नेहमीच आक्रमक असायचे त्यामुळे त्यांचे अपहरण करून धोडी यांना गुजरातमध्ये नेल्याचा संशय धोडी कुटुंबाकडून व्यक्त केला जात आहे.
Live Update : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस नेते महू येथील सभास्थळी रवाना
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाराष्ट्रातील काँग्रेस नेते महू येथील सभास्थळी रवाना झाले आहेत
आज काँग्रेसचा मेळावा महू गावात पार पडणार आहे
या मेळाव्याला राहुल गांधी उपस्थित असणार आहेत
या मेळाव्यात विशेष लक्ष आहे, कारण प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा या दौऱ्या दरम्यान केली जाऊ शकते
Live Update : घरच्यांकडून लग्नास विरोध, अल्पवयीन प्रेमी युगुलाची विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या
अल्पवयीन प्रेमी युगुलाची विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या
एक्सप्रेससमोर उडी घेऊन उचललं टोकाचं पाऊल
मुलीचं वय 15 तर मुलाचं वय 19
घरच्यांचा लग्नाला विरोध असल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती
Live Update : अंधेरीनंतर आता कांदिवलीमधील शाळेला धमकीचा मेल
अंधेरीनंतर आता कांदिवलीमधील शाळेला धमकीचा मेल.
रायन शाळेला आलेल्या धमकीच्या मेलनंतर आता कांदिवलीतल्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेला धमकीचा मेल आला आहे. कांदिवली एज्युकेशन ट्रस्टच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेला अफजल गँगच्या नावे धमकी आली होती. शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती. पोलिसांनी शाळेत तपासणी केली असता संशयास्पद असे काहीही आढळले नाही.
Live Update : कुंभमेळ्यात आज धर्मसंसद
कुंभमेळ्यात आज २७ जानेवारीला धर्मसंसद
या धर्मसंसदेत चार शंकराचार्य, 13 आखाड्यांचे प्रतिनिधी, विविध संप्रदायांचे पिठाधीश्वर, धर्माचार्य, प्रख्यात कथावाचकही सहभागी होणार आहेत. धर्मसंसदेत सनातन बोर्डाची स्थापना, श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरावरील अतिक्रमण हटवून भव्य मंदिर उभारणी इत्यादीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तिरुपतीच्या बालाजी मंदिरातील प्रसादातील भेसळ प्रकरणातील दोषींना शिक्षा देणे, सनातनी धर्माचार्यांसाठी संसदेत 50 जागा आरक्षित करणे आणि सनातनच्या धार्मिक हक्कांचे रक्षण यासारख्या विषयांवर चिंतन-मंथन होईल.
देवकीनंदन ठाकूर यांच्या तंबूमध्ये ही धर्मसंसद होईल.
Live Update : मनसे नेते अमेय खोपकर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर राज ठाकरेंची भेट घेणार
थोड्याच वेळात मनसे नेते अमेय खोपकर छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत राज ठाकरेची भेट घेणार. छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांना नृत्य करताना दाखवल्याने आक्षेप घेण्यात आला होता. या वादानंतर छावाचे दिग्दर्शक आज राज ठाकरेंना भेटणार.
Live Update : बेपत्ता मुलाच्या शोधासाठी आईचं उपोषण
गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध लागावा या मागणीसाठी पंढरपूर जवळच्या तिसंगी येथील पमाबाई भिलारे या वृध्द आईने आज पासून पंढरपूरच्या तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शंकर भिलारे ( वय 35 ) हे 30 जुलै 2021 रोजी पासून बेपत्ता आहेत. बेपत्ता झाल्याची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता शंकर भिलारे यांचा अद्याप शोध लागला नाही. शंकर भिलारे यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या आई पमाबाई आणि भाऊ मधुकर भिलारे यांनी व्यक्त करत जावई, त्यांची पत्नी आणि मुलाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. शंकर भिलारे यांना शोधून काढावे या मागणीसाठी येथील तहसिल कार्यालय समोर आई,भाऊ आणि त्यांच्या नातेवाईकांनी आज पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
Live Update : अजित पवारांचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
अजित पवारांचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
Live Update : कोस्टल रोडच्या पहिल्याच दिवशी नागरिकांची तारांबळ
कोस्टल रोडच्या नवीन रस्त्याच उदघाटन काल मुंबई देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलं
मात्र पहिल्याच दिवशी नागरिकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे
सी लिंकला जाणारा नेहमीचा रस्ता बंद केल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे
जो नवीन रस्ता सुरु केला आहे सी लिंकला जाण्यासाठी तिथली पाटी (नेम प्लेट) छोटी असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे
यामुळे या भागात काही प्रमाणात ट्रॅफिक जॅम देखील पाहायला मिळत आहे
वाहतूक विभागाकडून या जागी नागरिकांची मदत केली जात आहे
Live Update : उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार...
शिवसेना ठाकरे गटाची ठाणे जिल्ह्याची उद्या मातोश्रीवर आढावा बैठक
उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेणार...
याअगोदर मुंबईतील सर्व विधानसभांचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला होता त्यानंतर उद्या ठाणे जिल्ह्याचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत.
शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश...
मुंबई महानगर पालिका ठाकरे गटाने स्वबळावर लढावी अशी मागणी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी केली होती त्यानंतर ठाण्याची बैठक बोलावण्यात आली आहे. ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची काय भूमिका असेल याकडे लक्ष.
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिला मानला जात असताना ठाकरे गटाची कशी रणनीती असेल याकडे देखील लक्ष...
2 फेब्रुवारीपासून ठाकरे गटाच ठाणे जिल्ह्यात शिव सर्वेक्षण अभियान सुरु होणार असून यासंदर्भात स्थानिक पदाधिकाऱ्यांना उद्या सूचना केल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती
Live Update : आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबई विभागाची जिल्हानिहाय बैठक
आजपासून दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबई विभागाची जिल्हानिहाय बैठक पार पडणार आहे. सकाळी 11 पासून दुपारी 2 पर्यंत बैठक होईल. आज उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई तर मंगळवारी दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबईची बैठक पार पडणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित बैठक पार पडेल. मागील महापालिका निवडणुकीत 57 जागा एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढल्या होत्या. यावेळी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत मात्र वेगळी परिस्थिती आहे. यंदा महाविकास आघाडी म्हणून लढायचं की वेगळा निर्णय घ्यायचा याबाबत बैठकीत खलबत होतील.
Live Update : एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरे गटाचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरे गटाचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन
Live Update : जळगावात बुलेटच्या धडकेत वृद्ध ठार
ळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात बुलेटची रेस मध्ये एका बुलेटने एका वृध्द पादचाऱ्यास धडक दिल्याने या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरी बुलेट रस्त्यावर उभ्या असलेल्या ऑटो रिक्षावर जावून धडकली आहे. या अपघातानंतर बुलेटची रेस लावणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बुलेट ऑटो रिक्षावर धडकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.