
Pune Metro Weekend Offer News: पुणे मेट्रोने (Pune metro) प्रवास करणाऱ्यांसाठी एक सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे मेट्रोने वीकेंड प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी (Weekend) मेट्रोच्या प्रत्येक प्रवासावर थेट ३० टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय पुणेकरांना मेट्रो प्रवासासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे.
विकेंड होणार स्पेशल, पुणे मेट्रोची खास ऑफर! | Pune Metro Weekend Offer
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी तसेच रविवारी पुणेकर खरेदीसाठी, फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. विकेंडला घराबाहेर पडणाऱ्या याच नागरिकांसाठी पुणे मेट्रोने एक खास अन् झक्कास ऑफर आणली आहे. विकेंडला पुणे मेट्रोने प्रवास केल्यास प्रत्येक तिकीटावर 30 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
तुमचा वीकेंड करा स्पेशल, फक्त पुणे मेट्रोसोबत!
— Pune Metro Rail (@metrorailpune) September 19, 2025
आता वीकेंडचा प्रवास बनवा अधिक आनंददायी. मेट्रोच्या प्रत्येक प्रवासावर मिळवा थेट ३०% सवलत आणि अनुभव सुरक्षित प्रवास, आरामदायी आसनव्यवस्था, स्मार्ट प्रवासाचा आनंद...
वीकेंडला नक्की निवडा, पुणे मेट्रो!
Make your weekend special with… pic.twitter.com/AApRQE1ZRq
मेट्रो प्रशासनाने (Pune Metro Administration) दिलेल्या माहितीनुसार, या सवलतीमुळे प्रवाशांना सुरक्षित, आरामदायक आसनव्यवस्था आणि जलद प्रवासाचा अनुभव घेता येईल. मेट्रो ही शहरी वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून समोर येत असून, या सवलतीमुळे पुणेकरांना खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडण्यास प्रोत्साहन मिळेल.
सध्या पुणे शहरात पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर आणि वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक या दोन मार्गांवर मेट्रो सेवा सुरू आहे. विकेंडला अनेकजण खरेदी, पर्यटन किंवा मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी बाहेर पडतात. अशावेळी ही सवलत प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक ठरू शकते. या योजनेमुळे विकेंडला मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ होण्याची अपेक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world