जाहिरात

Pune Metro : IT पार्कच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; वाहतूक कोंडीतून सुटका, नव्या मेट्रोची ही आहेत स्थानकं!

भक्ती शक्ती चौक ते चाकण असा हा प्रस्तावित मार्ग असून यामुळे हिंजवडी आणि चाकणमधील आयटी पार्क आणि एमआयडीसीमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune Metro : IT पार्कच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; वाहतूक कोंडीतून सुटका, नव्या मेट्रोची ही आहेत स्थानकं!

सूरज कसबे, प्रतिनिधी

Pimpri-Chinchwad to Chakan Metro Line Proposed : पिंपरी-चिंचवड आणि चाकण यांसारख्या शहरांतील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नवीन मेट्रो मार्गाचे सादरीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले आहे. भक्ती शक्ती चौक ते चाकण असा हा प्रस्तावित मार्ग असून यामुळे हिंजवडी आणि चाकणमधील आयटी पार्क आणि एमआयडीसीमधील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रस्तावित मार्गाची वैशिष्ट्ये
हा मेट्रो मार्ग जवळपास 41 ते 42 किलोमीटर लांबीचा असेल आणि तो पिंपरी-चिंचवडमधील भक्ती शक्ती चौकातून सुरू होईल. या मार्गावर प्रस्तावित असलेली प्रमुख स्थानके पुढीलप्रमाणे आहेत:

 * भक्ती शक्ती चौक
 * मुकाई चौक
 * भूमकर चौक
 * भुजबळ चौक
 * पिंपळे सौदागर
 * नाशिक फाटा
 * वल्लभनगर
 * टाटा मोटर्स कंपनी
 * तळवडे एमआयडीसी
 * चाकण एमआयडीसी
 * चाकण शहर

Navi Mumbai News : ठाणे ते नवी मुंबईतील अंतर कमी होणार; वाहतूक सुलभीकरणासाठी आणखी एक जबरदस्त पर्याय

नक्की वाचा - Navi Mumbai News : ठाणे ते नवी मुंबईतील अंतर कमी होणार; वाहतूक सुलभीकरणासाठी आणखी एक जबरदस्त पर्याय

या प्रस्तावित मार्गामुळे हिंजवडी आणि तळवडे एमआयडीसी तसेच चाकण एमआयडीसीमधील लाखो कर्मचाऱ्यांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणार असून त्यानंतर या मेट्रो मार्गावर अंतिम निर्णय घेतला जाईल. अजित पवार यांनी यापूर्वीच वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी दौरे केले असून हा प्रस्तावित मार्ग याच प्रयत्नांचा एक भाग आहे.
या विस्तारित मेट्रो मार्गामुळे पिंपरी-चिंचवड, हिंजवडी आणि चाकण परिसरातील दळणवळण व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल अशी अपेक्षा आहे. नाशिक फाटा ते चाकण मेट्रोचे काम मंजुरी मिळून जेजे मेट्रोचे पदाधिकारी यांनी म्हटले आहे. तर सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो काम सुरू असून काही स्टेशनवर मेट्रोची चाचणी देखील पूर्ण झाली आहे. काम पूर्ण झाल्यावर या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन झाल्यानंतर ही प्रवाशांच्या सेवेत खुली होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com