जाहिरात

Pune News: शासनाचा दणका! पुणे जिल्ह्यातील 68 हजार रेशनकार्ड धारकांवर संक्रांत; प्रकरण काय?

पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मधील तब्बल ६८ हजार संशयास्पद शिधापत्रिका प्रशासनाच्या रडारवर आल्या असून, त्यांच्यावर लवकरच अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे.

Pune News: शासनाचा दणका! पुणे जिल्ह्यातील 68 हजार रेशनकार्ड धारकांवर संक्रांत; प्रकरण काय?

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Pune News:  पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत मोठी अन् महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  पुणे जिल्ह्यातील ६८ हजार संशयास्पद रेशनकार्ड धारकांवर संक्रांत येणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी अशी रेशनिंग कार्ड बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत तहसीलदारांकडून अंतिम कारवाई करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पिंपरी चिंचवडमधील शिधा पत्रिका धारकांचाही समावेश आहे. 

PCMC News: पिंपरी चिंचवडमध्ये हायटेक सुरक्षा कवच! AI च्या मदतीने गुन्हेगारीवर वचक; काय आहे प्लॅन?

पुणे जिल्ह्यातील 68 हजार रेशनकार्ड धारकांवर संक्रांत

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने शिधापत्रिकांच्या शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत पुणे जिल्ह्यातील  पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मधील तब्बल ६८ हजार संशयास्पद शिधापत्रिका प्रशासनाच्या रडारवर आल्या असून, त्यांच्यावर लवकरच अपात्रतेची कारवाई केली जाणार आहे.

प्रशासनाने आधार कार्ड क्रमांक आणि संगणकीय प्रणालीमधील माहितीच्या आधारे जिल्ह्यानुसार संशयास्पद लाभार्थ्यांच्या याद्या तयार केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील बाबींची तपासणी केली जात आहे, यात मृत व्यक्तींची नावे अद्यापही कार्डावर असणे, एकाच व्यक्तीचे नाव दोन ठिकाणी (दुबार) असणे. माहितीमध्ये तफावत असलेले संशयास्पद लाभार्थी याचा तपास केला जात आहे.

Padma Award 2026 : यंदाचं वर्ष महाराष्ट्रासाठी खास! 15 दिग्गजांचा पद्म पुरस्काराने गौरव; पाहा संपूर्ण यादी

तहसीलदार घेणार अंतिम निर्णय

या मोहिमेचे गांभीर्य लक्षात घेता, पुरवठा निरीक्षक सध्या प्रत्यक्ष घरोघरी जाऊन पडताळणी करत आहेत. या तपासणीनंतर सादर होणाऱ्या अहवालाच्या आधारे संबंधित नावे वगळण्याचे अंतिम अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्थेतील गैरप्रकारांना चाप बसणार असून, खऱ्या लाभार्थ्यांसाठी धान्याचा साठा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com