जाहिरात

Pune News: 'रात्री 12 वाजता...' पुण्यातील 8 वीतील मुलाचा VIDEO, अवस्था पाहून पित्याला रडू कोसळलं

Pune School Boy Viral Video: मुलांच्या बुद्धिमतेला, क्षमतेला झेपेल असे ते प्रोजेक्ट असतात ज्यामुळे मुलेही अगदी आनंदाने ते पूर्णही करतात.

Pune News: 'रात्री 12 वाजता...' पुण्यातील 8 वीतील मुलाचा VIDEO, अवस्था पाहून पित्याला रडू कोसळलं

Pune School Boy Viral Video:  अलिकडच्या काळात शाळा, महाविद्यालयांच्या बदलत्या स्वरुपांनी विद्यार्थ्यांचे बालपण हिरावले असे वारंवार म्हटलं जाते. अगदी पहिली, दुसरीपासून चिमुकल्यांच्या खांद्यावर दप्तर अन् अपेक्षांचे इतके ओझे असते की चिमुकले कंटाळून जातात. सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका पालकाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांचा मुलगा रात्री 12 वाजता काय करतोय? हे सांगत शाळांच्या व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. (Pune Father Son Viral Video) 

नेमका काय आहे व्हायरल व्हिडिओ..?

शाळा, महाविद्यालयात असताना अनेक प्रोजेक्ट, होमवर्क दिले जातात. मुलांच्या बुद्धिमतेला, क्षमतेला झेपेल असे ते प्रोजेक्ट असतात ज्यामुळे मुलेही अगदी आनंदाने ते पूर्णही करतात. मात्र अलिकडे शिक्षक विद्यार्थ्यांना असा काही होमवर्क देतात की मुलांचा तर जीव निघतोच सोबत पालकांनाही त्रास होतो. पुण्यातील एका व्यक्तीने असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Who Is Viral Ravi Sharma: लाखो-करोडोंच्या बाता मारणारा रवी शर्मा आहे तरी कोण? तुम्हीही VIDEO

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की रात्रीच्या १२ वाजल्यानंतरही एक चिमुकला त्याच्या शाळेचा प्रोजेक्ट करत आहे. हा मुलगा झोप सोडून शिक्षकांनी दिलेला प्रोजेक्ट पूर्ण करत आहे. त्याच्या अवतीभोवती रंगीत कागद दिसत आहेत, हे कागद पुठ्ठ्यावर चिकटवून नवीन कलाकृती तयार करण्याचा त्याचा हा प्रोजेक्ट आहे. मात्र त्याला हे काम जमत नसल्याने बिचारा जीव चांगलाच टेन्शनमध्ये आल्याचे दिसत आहे. 

वडिलांनी मांडली व्यथा...

त्याच्या वडिलांनाही यावरुनच व्हिडिओ शेअर करत चिमुकल्या जिवाला होत असलेल्या त्रासाबद्दल व्यथा मांडली आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, शाळा काही कामाच्या नाहीत. आता मध्यरात्रीचे १२ वाजले आहेत. गृहपाठ (Homework) पूर्ण करूनही माझा ८ वीतील मुलगा अजूनही काहीतरी निरर्थक प्रकल्प (Nonsense Project) करत आहे.

त्याला एवढी दहशत आहे की जर त्याने तो प्रकल्प पूर्ण केला नाही, तर त्याला त्याच्या आवडत्या पीटी (PE - Physical Education) तासाला सहभागी होऊ दिले जाणार नाही. तो रोज रात्री १२ ते १२:३० पर्यंत जागा असतो. पालक म्हणून मी या सडलेल्या व्यवस्थेपुढे (Rotten System) पूर्णपणे असहाय (Helpless) झालो आहे. ज्या गोष्टींच्या मी नेहमी विरोधात होतो, त्याच गोष्टींचा सामना मला आता माझ्या मुलासाठी करावा लागत आहे.

पुरंदर विमानतळाबाबत मोठी अपडेट! शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळणार? प्रशासनाने सांगितलं

दरम्यान, नितीन धर्मावत यांची ही पोस्ट लाखो लोकांनी पाहिली असून त्यावर भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मुलांकडून अवास्तव जबाबदाऱ्या अन् अपेक्षा ठेवल्याने त्यांच्या मानसिकतेवर, आरोग्यावर परिणाम होत असल्याचे म्हटले आहे तर काही पालकांनी याचे समर्थनही केले आहे. मुलांच्या भवितव्यासाठीच हे प्रोजेक्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com