जाहिरात

ससून हॉस्पिटलचा आणखी एक भोंगळ कारभार, रुग्णांवर या गोष्टीसाठी टाकला जातोय दबाव

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला आणखी एक भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. या गोष्टीसाठी डॉक्टरांकडून रुग्णांवर दबाव टाकला जात आहे.

ससून हॉस्पिटलचा आणखी एक भोंगळ कारभार, रुग्णांवर या गोष्टीसाठी टाकला जातोय दबाव

प्रतीक्षा पारखी, पुणे

पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये सुरू असलेला आणखी एक भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. येथील रुग्णांना खासगी मेडिकलमधून साहित्य खरेदी करण्यावर दबाव टाकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटल गरिबांचे हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. या हॉस्पिटलमध्ये पुणे शहरासह महाराष्ट्रातील असंख्य रुग्ण उपचारांसाठी येत असतात. येथे येणारे बहुतांश रुग्ण हे बहुतांश गरीब कुटुंबातील असतात, ज्यांची आर्थिक परिस्थिती खासगी हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेण्याइतपत चांगली नसते.

(नक्की वाचा: माळशेज घाटात भीषण अपघात, दरड कोसळून काका-पुतण्याचा जागीच मृत्यू)

महाराष्ट्र मुस्लिम कॉर्पोरा नावाची संस्था पुणे शहरामध्ये 'एक कॉल प्रोब्लेम सोल्व्ह' या मोहिमेअंतर्गत लोकांची सेवा करत आहे. त्यांच्या कार्यालयामध्ये ससून हॉस्पिटलविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस ससून हॉस्पिटलमधील घडामोडी या वर्तमानपत्र आणि सोशल मीडियाद्वारे समोर येत आहेत. 

(नक्की वाचा: Pune Porsche Accident Case: आरोपी विशाल अग्रवालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल)

सूसन हॉस्पिटलमध्ये काही-न्-काही गोंधळ होतच आहे. याबाबत संबंधित संस्थेने ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशनच केले. त्यांनी ससून हॉस्पिटलमध्ये परस्पर जाऊन परिस्थितीची पाहणी करून घेतली असता असे लक्षात आले की, या हॉस्पिटलमध्ये काही डॉक्टरांकडून कित्येक रुग्णांची लूट केली जात आहे. एक डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांकडे पैशाची मागणी करत होते. या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. यामुळे कित्येक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अशा डॉक्टरांच्या फतव्याला बळी पडत आहेत.  

(नक्की वाचा: पुण्यातील शनिपारमधील मुलींच्या वसतिगृहाला आग; एकाचा मृत्यू, 42 जणी बचावल्या)

मागील काही दिवसांमध्ये पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याच्या घटनेमुळे ससून हॉस्पिटल प्रशासनावर सर्व स्तरावर टीका करण्यात येत होती. यानंतर आता समोर आलेल्या स्टींग ऑपरेशनमुळे ससून हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, स्टाफ आणि बाहेरून परवानगी नसताना औषध पुरवणारे एजंटविरोधात SIT मार्फत कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी संबंधित संस्थेने केली आहे.  

सुनेत्रा पवारांना राज्यसभेच्या उमेदवारीवरुन NCP मध्ये मतभेद, बैठकीत काय घडलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com