जाहिरात

Solapur Accident: अक्कलकोटला निघाले, वाटेत अनर्थ घडला; पनवेलमधील 5 भाविकांचा मृत्यू

मोहोळ पोलीस सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम करत असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Solapur Accident: अक्कलकोटला निघाले, वाटेत अनर्थ घडला; पनवेलमधील 5 भाविकांचा मृत्यू

सौरभ वाघमारे, सोलापूर:

Pune Solapur Highway Accident News:  सोलापूरमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर कार झाडावर आदळून भयंकर दुर्घटना घडली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अक्कलकोटला देवदर्शनाला जाताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

देवदर्शनाला जाताना भीषण अपघात...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ जवळील देवडी पाटी येथे शनिवारी रात्री एक भीषण अपघात घडला. भाविकांनी भरलेली एक कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. हे सर्व भाविक पनवेल येथून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्घटना घडली.

Crime News: 4 महिन्यांपूर्वी लव्हमॅरेज, तरुणी 2 मुलांसोबत बेडरुममध्ये, पतीने पाहिलं अन्... भयंकर घटना!

​मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. भरधाव वेगाने निघालेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्त्याशेजारील मोठ्या झाडावर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला असून, पाच प्रवाशांनी जागीच प्राण गमावले. जखमी महिलेला तातडीने मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. मोहोळ पोलीस सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम करत असून, या घटनेमुळे पनवेल परिसरात आणि अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune School Holiday: पुण्यात 'या' दिवशी, शाळा, कॉलेजला सुट्टी! वाहतुकीतही मोठे बदल, मुख्य रस्ते बंद...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com