जाहिरात

Rain Alert : राज्यात 26 ते 28 डिसेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Rain Alert : राज्यात 26 ते 28 डिसेंबरदरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील 21 जिल्ह्यांत 26 ते 28 डिसेंबरदरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 26 व 27 डिसेंबरला नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह 11 जिल्ह्यांत गारपिटीचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला  आहे. त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढू शकते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कुठे पावसाचा अंदाज?

नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वाशिम, शेगाव, पुणे, गोंदिया, चंद्रपूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांच्य कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. 

(नक्की वाचा- Mumbai Air Pollution : मुंबईतील हवेचा दर्जा ढासळला; प्रदूषण रोखण्यासाठी BMC ची नियमावली)

गारपिटीचा अंदाज 

नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रब्बी पिकांसह फळबागांना गारपीटचा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच आता रब्बी हंगामात गारपिट झाल्यास, यंदाचे वर्ष शेतकऱ्यांच्या हातून जाणार आहे.

(नक्की वाचा-  1 जानेवारीपासून Whatsapp 'या' स्‍मार्टफोन्‍सवर चालणार नाही, लिस्टच आली समोर)

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओला दुष्काळाचा फटका?

मराठवाड्यातील 8486 पैकी 6150 गावांची अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आली आहे. तर उर्वरीत 2336 गावांची पैसेवारी 50 पैसे पेक्षा अधिक आहे. या अंतिम पैसेवारीमुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ अधोरेखीत झाला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी पाहायला मिळाली होती. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. दरम्यान, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांतील 6150 गावांची अंतिम पैसेवारी 50 पेक्षा कमी आली आहे. त्यामुळे, अंतिम पैसेवारी 50 पैसेपेक्षा कमी असलेल्या गावांमधून शेतकऱ्यांचा शेतसारा माफ केला जाऊ शकतो, विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ होईल. विज देयकात 33 टक्के सूट मिळण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: