जाहिरात

1 जानेवारीपासून Whatsapp 'या' स्‍मार्टफोन्‍सवर चालणार नाही, लिस्टच आली समोर

Whatsapp News : जुन्या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये नवीन ॲप अपडेट सपोर्टसाठी आवश्यक क्षमता नसतात. यामुळे सुरक्षेसंबंधित अनेक प्रश्न उपस्थित होतात, असं कंपनीचं म्हणणं आहे.

1 जानेवारीपासून Whatsapp 'या' स्‍मार्टफोन्‍सवर चालणार नाही, लिस्टच आली समोर

मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपचा 1 जानेवारी 2025 पासून अनेक स्मार्टफोनवर सपोर्ट बंद होणार आहे . व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाने याबाबत माहिती दिली आहे. नवीन वर्षापासून व्हॉट्सॲप किटकॅट ओएस (KitKat OS) किंवा जुन्या व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉइड डिव्हाइसवर काम करणार नाही. 

WhatsApp दरवर्षी ॲपची सुरक्षा आणि कार्यक्षमता याबाबत अपडेट आणत असते.  2013 मध्ये Android KitKat लाँच करण्यात आले होते. म्हणजे जुन्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सॲप सपोर्ट बंद होणार आहे. इतर स्मार्टफोनमध्ये ते पूर्वीप्रमाणेच काम करत राहील. 

जुन्या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये नवीन ॲप अपडेट सपोर्टसाठी आवश्यक क्षमता नसतात. यामुळे सुरक्षेसंबंधित अनेक प्रश्न उपस्थित होतात, असं कंपनीचं म्हणणं आहे. या निर्णयानंतर व्हॉट्सॲप सपोर्टवर अनेक ब्रँडच्या मॉडेल्सवर परिणाम होणार आहे. सॅमसंग, एलजी, सोनी, एलजी इत्यादी कंपन्यांचे स्मार्टफोन वापरकर्त्यांना याचा फटका बसणार आहे. 

(नक्की वाचा-  Tata Motors ने दिला झटका, आता कार खरेगी महागणार; किंमत कितीने वाढणार?)

या फोन्समध्ये व्हॉट्सॲप काम करणार नाही

  • Samsung : Galaxy Note 2, Galaxy S3, Galaxy S4 Mini, Galaxy Ace 3 
  • LG : LG Optimus G, Nexus 4, G2 Mini, L90
  • Motorola : Moto G (1st Gen), Razr HD, Moto E 2014
  • HTC : One X+, Desire 500, Desire 601
  • Sony : Xperia Z, Xperia SP, Xperia T, Xperia V

(नक्की वाचा - दुबईतील नव्या नियमांमुळे व्हिसा नाकारण्याच्या प्रमाणात मोठी वाढ, भारतीयांनी ट्रिप प्लान करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?)

आयफोन वापरकर्त्यांनाही फटका बसणार

व्हॉट्सॲपच्या या निर्णयाचा अॅपल यूजर्सवरही परिणाम होणार आहे. कंपनीने म्हटले आहे की ते 5 मे 2025 पासून 15.1 च्या आधीच्या iOS व्हर्जनवर चालणाऱ्या iPhones ला सपोर्ट करणार नाही. कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 5 महिन्यांचा वेळ देत आहे, जेणेकरून ते अपडेट केलेल्या iOS व्हर्जनवर स्विच करू शकतील. याचा परिणाम आयफोन 5s, आयफोन 6 आणि आयफोन 6 प्लस वापरणाऱ्या वापरकर्त्यांवर होईल.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com