जाहिरात

Rain Update : राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट; खरीप हंगाम संकटात येण्याची भीती

जूनमध्ये महाराष्ट्रात एकंदर चांगला पाऊस पडला. मात्र राज्यातील किमान २० जिल्ह्यांमध्ये या महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट आहे. यापैकी बहुतेक जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत तर तीन मध्य महाराष्ट्रातील आहेत.

Rain Update : राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट; खरीप हंगाम संकटात येण्याची भीती

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी मे महिन्यापासूनच पावसाने हजेरी लावली. अनेक धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी जून पहिल्याच आठवड्यात पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. एकीकडे मुसळधार पावसाने हजेरी लावली असली तरी अनेक भागामधील नागरिक अजूनही दमदार पावसाची वाट पाहत आहेत.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यावर्षी यावजूनमध्ये महाराष्ट्रात एकंदर चांगला पाऊस पडला. मात्र राज्यातील किमान २० जिल्ह्यांमध्ये या महिन्यात मोठ्या प्रमाणात पावसाची तूट आहे. यापैकी बहुतेक जिल्हे मराठवाडा आणि विदर्भातील आहेत तर तीन मध्य महाराष्ट्रातील आहेत. यावर्षी जूनमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची तूट असलेल्या किमान २० जिल्ह्यांपैकी, वाशिममध्ये सर्वाधिक ८६ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे. 

(नक्की वाचा -  Shivsena Protest: ठाकरे गट घेणार बँकांची शाळा; पिक कर्ज नाकारणाऱ्या बँकांना जाब विचारणार)

वाशिम नंतर अकोला -७७ टक्के, नागपूर -७४ टक्के, हिंगोली -७३ टक्के, भंडारा -७० टक्के, गडचिरोली -६८ टक्के, बीड -६७ टक्के, जालना -६४ टक्के, गोंदिया -६२ टक्के, सोलापूर -५९ टक्के आणि परभणी -५८ टक्के या जिल्ह्यामध्ये पावसाची तूट आहे.  अनेक जिल्हे मोठ्या पावसाच्या तुटी सामना करत आहेत. 

उशिरा किंवा अपुरा पाऊस पडल्याने खरीप पिकाला याचा फटका बसू शकतो. ज्यामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो आणि येणाऱ्या हंगामातील एकूण कृषी उत्पादकतेवर देखील परिणाम होऊ शकतो.

(नक्की वाचा- Palghar News: बियाणे खरेदी केलं, तरच खत देणार; कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक)

महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक ११० टक्के पाऊस पडला. जूनमध्ये आजपर्यंत एकूण २४८.८ मिमी पाऊस पडला आहे, तर सरासरी ११८.५ मिमी पाऊस पडतो. दरम्यान, जूनच्या उर्वरित दिवसांत राज्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com