जाहिरात

Jalgaon News: एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेताभोवती वन्यजीवांच्या त्रासापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण घालून त्यात धोकादायकपणे वीजप्रवाह सोडला होता.

Jalgaon News: एकाच कुटुंबातील 5 जणांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, जळगावातील हृदयद्रावक घटना

मंगेश जोशी, जळगाव

एकाच कुटुंबातील पाच जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील वरखेडी गावात ही दुर्दैवी घटना घडली. शेतात वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी लावलेल्या एका अवैध तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्यामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरखेडी गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेताभोवती वन्यजीवांच्या त्रासापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी तारेचे कुंपण घालून त्यात धोकादायकपणे वीजप्रवाह सोडला होता. ही एक बेकायदेशीर आणि अत्यंत धोकादायक पद्धत आहे, ज्याचा परिणाम समोर आला आहे. कामगार म्हणून काम करणाऱ्या एका कुटुंबातील सदस्यांना या कुंपणामध्ये वीजप्रवाह असल्याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. निष्काळजीपणाने केलेल्या या कृत्याचा परिणाम म्हणून एका क्षणात दोन महिला, एक पुरुष आणि दोन लहान मुलांना आपला जीव गमावला लागला आहे.

(नक्की वाचा-  UP News: कुत्र्याने चाटल्यामुळे 2 वर्षांच्या चिमुकल्याचा तडफडून मृत्यू, कुटुबीयांना एक चूक नडली)

या पाचही जणांचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मृतदेह घटनास्थळीच पडून होते आणि त्यांना ओळखणेही कठीण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी आणि इतर शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. माहिती मिळताच पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाचही जणाच्या कुंपणात वीजप्रवाह असल्याची माहिती नव्हती, त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.

(नक्की वाचा-  OMG! हायकोर्टाचे 2 जज पाहणीसाठी स्वता रस्त्यावर उतरले, खोटारड्या महापालिका अधिकाऱ्यांची आता खैर नाही)

या घटनेने शेतीच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या पद्धतींवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे रक्षण करणे आवश्यक असले तरी, असे जीवघेणे उपाय वापरणे कायद्याने गुन्हा आहे आणि ते मानवी जीवनासाठी अत्यंत धोकादायक आहे. या दुर्घटनेने प्रशासनावर आणि शेतीमधील सुरक्षिततेच्या नियमांवर कठोर कारवाई करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. एकाच कुटुंबाची एका क्षणात झालेली ही वाताहत पाहून संपूर्ण गाव हळहळले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com