"राज्यात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये", राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा

सध्या जे राजकारण सुरु आहेत ते कुणाच्या ना कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे. मतांच्या राजकारणासाठी हे राजकारण सुरु आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन सुरु असलेल्या संघर्षावर मोठं भाष्यं केलं आहे. राज्यात सध्या कुणाच्यातरी खांद्यावर बंदुका ठेवून मराठा आणि ओबीसी राजकारण सुरु आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांना शरद पवारांवरही निशाणा साधला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शरद पवार यांनी राज्यात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल की काय? अशी भीती व्यक्त केली होती. यावर बोलतान राज ठाकरे यांनी म्हटलं की, शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र शरद पवारांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं सांगता येणार नाही. 

(नक्की वाचा - विधानसभेच्या जागावाटपात महाविकास आघाडीत काँग्रेस 'मोठा भाऊ'? काँग्रेसच्या बैठकीत ठरला प्लान?)

महाराष्ट्र हे सर्वाधिक प्रगत राज्य आहे. अनेक ठिकाणी खासगीकरण सुरू आहे तेथे आरक्षण आहे का?  खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण किती प्रमाणात आहे. किती तरुणांना आरक्षणाचा लाभ होणार आहे, किती नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. याचा आपण अभ्यास करणार आहोत का? की नुसतं माथी भडकवण्याचं काम करून मतं हाती घेणार आहोत, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 

(नक्की वाचा - त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण..., फडणवीसांचं ट्विट; महिनाभरानंतर सिद्धांतचा मृतदेह सापडला!)

सध्या जे राजकारण सुरु आहेत ते कुणाच्या ना कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे. मतांच्या राजकारणासाठी हे राजकारण सुरु आहे. मराठा आणि ओबीसी मुलांचा यात विचार नाही. प्रत्येक समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत. यातून काहीच मिळणार नाही, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं. 

Advertisement

विधानसभेच्या 225-250 जागा लढवणार

लोकसभा निवडणुकीत केलेली युती नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यासाठी होती, हे तेव्हाच जाहीर केलं होते. मनसे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चारही राज ठाकरे यांनी केला. विधानसभेच्या 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केले.