
मुंबईमध्ये सध्या कबुतर खान्याच्या मुद्द्यावरुन चांगलेच राजकारण रंगताना दिसत आहे. न्यायालयाचे आदेश धुडकावून जैन समाज कबुतर खान्यांवरील कारवाईविरोधात आक्रमक झाला आहे. कबुतरांच्या रक्षणासाठी प्रसंगी शस्त्र उचलू.. असा इशाराही जैन मुनिंनी दिला आहे. यावरुनच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भूमिका स्पष्ट केली असून कोणी आदेश मोडत असेल तर कारवाई करावी, असे म्हणत सरकारवर थेट निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
"हायकोर्टाच्या निर्णयाने सर्वांना वागावे लागेल. जैन मुनी यांनी याचा विचार केला पाहिजे. कबुतरामुळे काय काय रोग होतात हे डॉक्टरांनी सांगून पण खायला घातलं असतील तर कारवाई व्हायला हवी. एकाने सुरुवात केली तर बाकी लोक पण ते वागणार आहे. मग हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट कशाला हवे?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
यंदा गणेशोत्सवात झळकणार 'ऑपरेशन सिंदूर'चे प्रतिबिंब; CM फडणवीसांचे मंडळांना आवाहन
"या प्रकरणात दोन्हीकडून आंदोलन केली. मग कारवाई का नाही? लोढा बिढासारखे लोक येतात. लोढाने ही समजून घ्यावे ते मंत्री आहेत, एका समाजाचे नेते नाहीत, सुरी वैगरे आणतात कारवाई करायला हवी. कालही पत्रकारांना वगेरे मारहाण झाली. आधी हिंदी आणली आता कबूतरांचा मुद्दा आणतात. काय करायचे काय यांना?" असे म्हणत राज ठाकरे यांनी सरकारवरही निशाणा साधला.
"कोणी काय खावे आणि काय नाही याचे महापालिकेने ठरवू नये. स्वातंत्र्य दिनाला खाण्याचेही स्वातंत्र्य नाही का? एकीकडे स्वातंत्र्यदिन म्हणायचे अन् खाण्यावर बंदी आणायची. असा विरोधाभास कशासाठी? कोणाचे काय धर्म आहेत, कोणाचे काय सण आहेत, याप्रमाणे कोणी काय खावं? हे सरकारने सांगू नये," असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
Ganeshotsav 2025: मुंबईकरांनो, कोकणात गणपतीला ST नेच जा! 30% भाडेवाढीचा 'तो' निर्णय रद्द
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world