Uddhav Thackeray : 'कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नका, श्रीखंड, बासुंदी खातील अन्....'; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सभागृहात हशा

मराठी बोलणार (Marathi Language Controversy) नसल्याचं वक्तव्य करणारे गुंतवणूक सुशील केडिया यावरही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, तो भेडिया का कोण, ही सगळी त्यांची पिलावळ आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: ते दोघे आले आणि त्यांनी जिंकलं. मराठी मुद्द्याच्या निमित्ताने दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर आले. यानिमित्ताने वरळीतील डोममध्ये मनसैनिक आणि शिवसैनिकांची तुफान गर्दी झाली होती. दोघे एकत्र व्यासपीठावर येताच सभागृहात एकच जल्लोष झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज ठाकरेंनी (Raj Uddhav Thackeray Alliance) भाषण केलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले, कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नका, श्रीखंड, बासुंदी खातील आणि नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. इतकं केलं तरी बरं नाहीतर त्या पोरीलाच पळून जातील, अशा शब्दात भाजपला टोला लगावला. 

भाजपबद्दल (Uddhav Thackeray on BJP) बोलताना ते पुढे म्हणाले, भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे तुमच्याहीपेक्षा जास्त कडवट कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत. मराठी माणूस महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही आणि गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करूच.

Advertisement

Advertisement

नक्की वाचा - Raj Thackeray Uddhav Thackeray Live : 'माझ्या चुकीबद्दल मी माफी मागतो', कार्यालय फोडल्यानंतर गुंतवणूकदार सुशील केडियांनी मागितली माफी

Advertisement

सुशील केडियावही संतापले...

मराठी बोलणार (Marathi Language Controversy) नसल्याचं वक्तव्य करणारे गुंतवणूक सुशील केडिया यावरही उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, तो भेडिया का कोण, ही सगळी त्यांची पिलावळ आहे. ते म्हणतात शिवसेनेने आजवर काय केलं ? राज मी तुला सोबत घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र आलो आहोत. ते म्हणतात मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेला. मराठी माणूस मुंबईबाहेर नेला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मुंबई महाराष्ट्राचे लचके तोडले, त्याचे काय? व्यवसाय, उद्योगधंदे पळवले त्याचे काय ? आपली ताकद ही आपल्या एकजुटीत असली पाहीजे. दरवेळी संकट आलं की आपण मराठी एकटतो, आणि संकट गेलं की आपापसात भांडायला लागतो. असा नतद्रष्टपणा आता करायचा नाहीये.