जाहिरात

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात अभिनेत्री चिन्मयी सुमितला नो एन्ट्री

मराठी भाषेसाठी वर्षानुवर्षे काम करणारी अभिनेत्री चिन्मयी सुमीत (Chinmayi Sumit on Marathi controversy) हिला मात्र ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात प्रवेश मिळत नसल्याचं दिसत आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava: ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात अभिनेत्री चिन्मयी सुमितला नो एन्ट्री

मराठी भाषेसाठी वर्षानुवर्षे काम करणारी अभिनेत्री चिन्मयी सुमीत (Chinmayi Sumit on Marathi controversy) हिला मात्र ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात प्रवेश मिळत नसल्याचं दिसत आहे. NDTV मराठीशी बोलताना त्यांनी आपली खंत (Marathi Language Controversy) व्यक्त केली. माझ्याकडे पास नाहीये त्यामुळे मला आत जाता येत नसल्याचं चिन्मयी सुमीत हिने सांगितलं.

'आत काही मराठी कलाकारांना सोडण्यात आलं आहे. मात्र मी मनसेच्या यादीतील नाही, मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेसाठी काम करीत आहे. आणि या मेळाव्याच्या निमित्ताने शासन दरबारी मराठी भाषेला पुन्हा एकदा महत्त्व मिळेल अशीही भावना चिन्मयी सुमीत हिने व्यक्त केली. 

Raj Thackeray Uddhav Thackeray Live: वरळी डोमबाहेर अभूतपूर्व गर्दी, राज्यभरातून मराठी एकवटले

नक्की वाचा - Raj Thackeray Uddhav Thackeray Live: वरळी डोमबाहेर अभूतपूर्व गर्दी, राज्यभरातून मराठी एकवटले

ती पुढे म्हणाली, या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी जाहीर आवाहन करण्यात आलं होतं. मराठीच्या प्रेमाखातर मी या मेळाव्यासाठी आले आहे. हे आंदोलन एक मुद्द्यापुरतं नाही..एकूण मराठी भाषा, जिचं महत्त्व शासन दरबारी कमी होताना दिसत आहे. त्यासाठी एकत्र येणं गरजेचं होतं.

मेळाव्यात सहभागी होता येत नसल्याबद्दल चिन्मयी म्हणाली, मी 25 टक्के अभिनेत्री आणि 75 टक्के कार्यकर्ती. त्यामुळे कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या अनुभवाला सामोरं जावं लागतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com