जाहिरात

Uddhav Thackeray Speech : लाडक्या बहिणींपासून पुष्पा पिक्चरपर्यंत; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे

शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा आज एकत्रित विजयी मेळावा पार पडला.

Uddhav Thackeray Speech : लाडक्या बहिणींपासून पुष्पा पिक्चरपर्यंत; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे

शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीचा अध्यादेश सरकारने मागे घेतला आहे. यासाठी ठाकरे बंधुंनी आक्रमक भूमिका घेतली होती. परिणामी सरकारने हा निर्णय मागे घेतला. या (Marathi language) मुद्द्यावरुन आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Uddhav Thackeray and Raj Thackeray) यांचा आज एकत्रित विजयी मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेनी मराठीच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर ताशेरे ओढले. उद्धव ठाकरेंनी आपल्या अनोख्या शैलीत सत्ताधाऱ्यांवर टोला लगावला. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे...
 

  1. आज आमच्या भाषणांपेक्षा आम्हा दोघांचे एकत्र दिसणे गरजेचे आहे.  आमच्या दोघांमधील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी. मधल्या काळात मी आणि राज, आणि आपण सगळ्यांनी या नतद्रष्ट्यांचा अनुभव घेतलाय... वापरायचं आणि फेकायचं. आता आम्ही दोघं तुम्हाला फेकून देणार आहोत.  
  2. भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केलं होतं की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही मराठी बोलणारे तुमच्याहीपेक्षा जास्त कडवट कट्टर, देशाभिमानी हिंदू आहोत. मराठी माणूस महाराष्ट्रात न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तुम्ही गुंड म्हणत असाल, तर आम्ही गुंड आहोत. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही आणि गुंडगिरी केल्याशिवाय तुमच्या दरबारी न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करूच.
  3. मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली होती. याचा मला अभिमान आहे. सक्ती केल्यानंतरही काहीजण कोर्टात गेले, ही गुंडगिरी नाही ? तो भेडिया का कोण, ही सगळी त्यांची पिलावळ आहे. ते म्हणतात शिवसेनेने आजवर काय केलं ? राज मी तुला सोबत घेतो कारण आपण तेव्हा एकत्रच होतो, आता सुद्धा पुढे एकत्र आलो आहोत. ते म्हणतात मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेला. मराठी माणूस मुंबईबाहेर नेला असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मुंबई महाराष्ट्राचे लचके तोडले, त्याचे काय? व्यवसाय, उद्योगधंदे पळवले त्याचे काय ?
  4. आपली ताकद ही आपल्या एकजुटीत असली पाहीजे. दरवेळी संकट आलं की आपण मराठी एकटतो, आणि संकट गेलं की आपापसात भांडायला लागतो. असा नतद्रष्टपणा आता करायचा नाहीये. गेल्या विधानसभेत त्यांनी जे केलं, बटेंगे तो कटेंगे. आमचे पंतप्रधान जगभर फिरतायत, स्टार ऑफ घानाचा पट्टा गळ्यात घालतायत. इकडे घाण आणि तिकडे घाना..स्टार ऑफ घाना. एका बाजूला मोदींचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला बैल पोसता येत नाही म्हणून शेतकऱ्याच्या खांद्यावर नांगराचं जोखड आहे. 
  5. पेपरला बातमी आलीय की लाडक्या बहिणीचे पोर्टल बंद, नव्याने नोंदणी होणार नाही, बसा बोंबलत. त्यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे सगळ्या भारतात कर्जबाजारी शेतकऱ्यांची संख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, कर्ज काढतच राहणार. मी एक साधी गोष्ट केली होती, चौपाटीला मराठी रंगभूमीचे दालनासाठीचा आराखडाही तयार झाली.
  6. मराठी भाषा भवनाचे भूमीपूजन मी केलं होतं, माझ्यासोबत अजित पवार होते. कुठे गेले मराठी भाषा भवन, कुठे गेले मराठी भाषा रंग दालन ? आमच्यावर सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अशी शक्ती दाखवू की तुम्ही पुन्हा डोके वर करणार नाही. आपल्यात पुन्हा काड्या घालण्याचे धंदे ते करतील.
  7. कोणाच्याही लग्नात भाजपवाल्यांना बोलवू नका. येतील श्रीखंड, बासुंदी खातील आणि नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जेवायला जातील. इतकं केलं तरी बरं नाहीतर त्या पोरीलाच पळून जातील.
  8. मुंबईसाठी रक्त सांडणाऱ्या, बलिदान देणाऱ्यांची शपथ घेऊन मुंबई मराठीच्या रक्षणासाठी आपल्याला उभे राहायला हवे. हनुमान चालिसाला विरोध नाही मात्र मारूती स्तोत्रही आहे ना ? आमचा जय श्रीरामला विरोध नाही, मात्र भेटल्यावर राम-राम म्हणणारे आम्हीच मराठी आहोत. तुम्ही आता जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लागलात. जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास स्वामींनी आम्हाला पहिले रामाची भक्ती शिकवली.
  9. एक गद्दार काल म्हणाला, जय गुजरात!, किती लाचारी करायची ? पुष्पा पिक्चरमध्ये तो म्हणतो झुकेगा नही साला, तसे हे गद्दार म्हणतात उठेगा नही साला. कुछ भी बोलो उठेगा नाही, उठण्यासारखे आहेच काय ? मी विचार म्हणतोय...विचार म्हणतोय. हिंदी  भाषा सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल? मालक आला म्हणून जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल?
  10. इथे काही अमराठी आले असतील. आपल्या सगळ्यांचे अमराठी मित्र आहे. जर हे गुण्यागोविंदाने राहीले तर आपली  पोळी कशी भाजली जाईल असं त्यांना  यासाठी मिठाचा खडा टाकता आहात ? मी राजला परवा फोन केला,  सगळे जण विचारत होते की पिक्चरचा प्रिमिअर आहे तसे विचारत होते की आज कसे येऊ, हा प्रिमिअर असेल पण आजपासून सुरूवात झाली आहे. आम्ही दादागिरी करणार नाही, मात्र कोणी केली तर ती सहनही करणार नाही.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com