सध्या राज्यामध्ये महायुती सरकारने मराठी (Marathi) सक्तीचा मराठीच्या सक्ती काढला होता त्यानंतर राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या या हिंदी सक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र (Uddhav Thackeray and Raj Thackeray) येणार जूनला जूनला आंदोलनाची घोषणा केली होती.
दरम्यान सध्या महाराष्ट्रात मराठीच्या (Marathi language) मुद्द्यावरुन मोठा वाद सुरू आहे. वर्सोव्यात राहणारी मराठी अभिनेत्री राजश्री मोरे या महिलेने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये महिलेने मराठी माणसाला कमी लेखत अनेक अपशब्द वापरले होते. मराठी माणसात मेहनत करण्याची ताकद नाही, परप्रांतीय मुंबईतून गेले तर मराठी माणसाला अवघड जाईल, अशा शब्दात तिने आपलं म्हणणं मांडलं होतं. यानंतर राजश्री हिच्या व्हिडिओवर आक्षेप घेण्यात आला होता. वर्सोवा विधानसभेच्या मनसे कार्यकर्त्यांनी थेट ओशिवरा पोलीस ठाणे गाठत महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर शेवटी महिलेला माफी मागावी लागली. याशिवाय तिला व्हिडिओही डिलिट करण्याची सूचना देण्यात आली आहे.
नक्की वाचा - Raj Thackeray Uddhav Thackeray Live : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळावा, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष
आज ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा...
शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवर ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. यानिमित्ताने आज मुंबईत ठाकरे बंधूंचा जल्लोष मेळावा आयोजित करण्यात येत आहे. राज ठाकरेंकडून महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला मराठी बोलता यायला हवं यासाठी आग्रही राहिली आहे. दोन दिवसांपूर्वी मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरुन मीरारोड भागातील एका व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून कानशिलात लगावण्यात आली होती. यानंतर मीरारोडमधील व्यावसायिकांनी बंदची हाकही पुकारली होती. या शिवाय व्यापाऱ्यांनी मोर्चाही काढला होता. या सर्व प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात पडत आहेत.
महायुती सरकारने याची दखल घेत हिंदी सक्तीच्या जीर रद्द केला. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळाले तसेच महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे असे बोलताना मीरारोड या भागात एक व्यापाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांकडून मराठी बोलणार नाही यावरून मनसे कार्यकर्त्याने कानाखाली लगावली. त्यानंतर व्यापारी लोकांनी मीरा रोड बंदची हाक देत मोर्चा काढला.
याचे पडसाद संपूर्ण महाराष्टात पाहायला मिळाले.