जाहिरात

Ratnagiri News: कोकणात हुंडाबळी! सासरच्या छळामुळे विवाहितेने आयुष्य संपवलं

कोकणातही हुंडाबळीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना दापोलीमध्ये घडली आहे.

Ratnagiri News: कोकणात हुंडाबळी! सासरच्या छळामुळे विवाहितेने आयुष्य संपवलं

रत्नागिरी: मुळशीमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या आणि हुंडाबळी प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. माहेराहून पैसे आणण्यासाठी वैष्णवीचा सासरच्यांकडून छळ करण्यात आला. हे प्रकरण चर्चेत असतानाच आता कोकणातही हुंडाबळीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना दापोलीमध्ये घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील जालगाव येथे एका 22 वर्षीय विवाहितेने पती व सासरच्या मंडळींच्या त्रासाला व छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. तशी फिर्याद विवाहितेच्या भावाने दापोली पोलिस स्थानकात केली आहे. या फिर्यादीवरून पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंकीदेवी धर्मेंद्रकुमार धामिन असं या आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव असून ती मूळची झारखंड येथील आहे.  याप्रकरणी भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पती धर्मेंद्रकुमार धामिन, दीर राजेशकुमार धामिन, सासू आणि सासरे रामदेव धामिन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पिंकीदेवी हिने 13 जून रोजी राहत्या घरी ओढणीच्या साहायाने गळफासाने आत्महत्या केली होती. तिचे पती बुरोंडी येथून कामावरून आल्यानंतर हा प्रकार उघडकीला आला होता. याबाबत दापोली पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, तिच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ वीरेंद्रकुमार जनार्दन पंडा यांनी फिर्याद दिली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash: आईच्या एका शब्दाने लेकाचा जीव वाचला! यमन व्यासची मृत्यूला हुलकावणी देणारी कहाणी

या फिर्यादीनुसार पिंकीदेवीला सासरच्या लोकांकडून सतत पैशांची मागणी, शिवीगाळ, धमकी आणि मानसिक छळ सहन करावा लागत होता. हा छळ 9 नोव्हेंबर 2023 ते 13 जून 2025 या कालावधीत सरू होता. असं फिर्यादीत म्हटले आहे. या त्रासाला कंटाळून पिंकीदेवीने आत्महत्या केल्याचे भावाने म्हटलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलिस करत आहेत.

नक्की वाचा-  Sudhakar Badgujar Joins BJP : दूध का दूध और पानी का पानी होगा! ठाकरेंना बडगुजरांचा इशारा)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com