रवी राणा-नवनीत राणांना महायुतीचा धक्का; विदर्भातील समन्वय बैठकीआधी काय झालं?

अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडत आहे. पश्चिम विदर्भातील महायुतीचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins

शुभम बायस्कर, अमरावती

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीचा बैठकांचा सिलसिला सुरु झाला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्षांना मतदारसंघाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम विदर्भाची महायुतीची समन्वय बैठक आज अमरावतीत पार पडत आहे. मात्र या बैठकीचं आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला निमंत्रणच दिलं नाही. आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे.

महायुतीकडून निमंत्रण नसल्याने रवी राणा समन्वय बैठकीला जाणार नाहीत. माझी खासदार नवनीत राणा यांना देखील महायुतीकडून निमंत्रण नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रवी राणा यांनी म्हटलं की, महायुतीचं कुठलंही निमंत्रण मला आलेलं नाही. अजूनपर्यंत निमंत्रण आलेलं नाही, मात्र आलं तर बैठकीला नक्की जाईल. स्थानिक राजकारनामुळे निमंत्रण न दिल्याचा आरोपी रवी राणा यांनी केला आहे. 

(नक्की वाचा- भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती? RSS-भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?)

अमरावतीच्या सांस्कृतिक भवन येथे तीनही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडत आहे. पश्चिम विदर्भातील महायुतीचे पदाधिकारी बैठकीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, शिवसेना शिंदे गटाकडून उदय सामंत, भाजपकडून आमदार प्रसाद लाड, सचिन जोशी, आशिष कुलकर्णी, संजय खोडके बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाण्यातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत.

(नक्की वाचा - 'मला फडणवीस, अजित पवारांनी शब्द दिलाय', भाजपा नेत्याची घोषणा, NCP आमदाराचं टेन्शन वाढलं)

भाजप 150 जागा लढण्याची शक्यता

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागावाटप आणि भाजप उमेदवार ठरवण्याचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असतील. महायुतीत 288 पैकी किमान 150 जागा भाजपला सोडवण्याची अट पक्षानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकली आहे. 

Advertisement

आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून 100 जागांवर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. तर अजित पवारांनीही तितक्याच जागांची मागणी केली आहे. मात्र या दोन्ही गटाला मिळून 138 जागांवर बोळवण केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

Advertisement