राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. युती आणि आघाडीमध्ये 3-3 पक्ष असल्यानं उमेदवारी मिळवण्यात चांगलीच चुरस आहे. एकाच जागेवर दोन दिग्गज उमेदवारांमध्ये स्पर्धा असलेले अनेक मतदारसंघ राज्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा यामध्ये समावेश आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमाव आमदार दत्तात्रय भरणे यांच्यात चुरस आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे जाते की भाजपकडे जाते हे अद्याप ठरलेले नाही. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे असे आज माजी मंत्री भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी भर भाषणात सांगितलं. हर्षवर्धन पाटील यांच्या विधानामुळे इंदापूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांचे टेन्शन नक्कीच वाढलं आहे.
मागील दोन विधानसभा निवडणुकीत भरणे विरुद्ध पाटील अशी थेट लढत झाली. दत्तात्रय भरणे या दोन्ही निवडणुकीत विजयी झाले. या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील तयारीला लागले आहेत.मागील काही दिवसापासून हर्षवर्धन पाटलां अपक्ष म्हणून निवडणूक लढणार अशी चर्चा होती.
ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांच्या घोषणेचे भाजपामध्ये पडसाद, फडणवीसांचा जवळचा हाती घेणार तुतारी?
इंदापूर मतदारसंघातील बावडा गावात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी इंदापूर तालुका विकास आघाडीची शाखा स्थापन करत त्याचे संकेतही दिले होते. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी हे वक्तव्य केल्यानं या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world