जाहिरात

कोकणातील खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचवणाऱ्या शिरीष गवसच्या निधनाने सोशल मीडिया हादरलं, चाहते हळहळले!

साधारण पाच वर्षांपूर्वी पूजा आणि शिरीष मुंबई सोडून कोकणात आले. त्यांनी कोकणातील खाद्यपदार्थ आणि येथील संस्कृती दाखविण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघांनी खास तयारी केली होती.

कोकणातील खाद्यसंस्कृती जगभरात पोहोचवणाऱ्या शिरीष गवसच्या निधनाने सोशल मीडिया हादरलं, चाहते हळहळले!

YouTuber Shirish Gavas passed away : प्रसिद्ध युट्यूबवर आणि कोकणची खाद्यसंस्कृती अत्यंत सुंदर पद्धतीने जगभरात पोहोचवणारा शिरीष गवस याचं वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी निधन झालं आहे. हे वृत्त समोर येताच चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. शिरीष गवस आणि त्याची पत्नी पूजा यांनी कोरोना काळात मुंबईतून गावी जाण्याचा निर्णय घेतला. कोकणात स्थलांतर झाल्यानंतर त्यांनी स्वत:चं युट्यूब चॅनल सुरू केलं. या युट्यूबला सहा ते सात भाषांमध्ये सबटायटल देण्यात आलं होतं. हे चॅनल विविध देशांमध्ये पाहिलं जात होतं. 

शिरीष हा मुंबईत सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत होता. तर पूजा जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून शिक्षण पूर्ण फाइन आर्टिस्ट म्हणून काम करीत होती. गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्यांनी सुरू केलेलं युट्यूब चॅनल Red Soil Stories कमी काळात लोकांसाठी खास झालं. कोकणातील लुप्त झालेले खाद्यपदार्थ Red Soil Stories च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता आले. साधारण तीन आठवड्यांपूर्वीच त्यांनी लेक श्रीजाच्या पहिल्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता. आणि अवघ्या काही दिवसात शिरीष गवस याच्या निधनाचं वृत्त समोर आलं. 

Latest and Breaking News on NDTV

नक्की वाचा - Alibaug News : अलिबागजवळ मच्छिमार बोट बुडाली, 5 खलाशांनी 9 तास पोहोत गाठला किनारा; तिघेजण अद्याप बेपत्ता

शिरीषच्या मृत्यूमागे काय आहे कारण?

मिळालेल्या माहितीनुसार, शिरीषला साधारण 20 दिवसांपासून ब्रेन हॅमरेजचा त्रास होत होता. साधारण दहा दिवसांपूर्वी त्याला गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी 2 ऑगस्ट रोजी त्याची तब्येत अधिक खालावली अन् यातच त्याने अखेरचा श्वास घेतला.

Latest and Breaking News on NDTV

अर्ध्यावरती डाव सोडला...

साधारण पाच वर्षांपूर्वी पूजा आणि शिरीष मुंबई सोडून कोकणात आले. त्यांनी कोकणातील खाद्यपदार्थ आणि येथील संस्कृती दाखविण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघांनी खास तयारी केली होती. घराची रचना त्यानुसार करण्यात आली होती. पूजा शेणाने सारवलेल्या चुलीवर स्वयंपाक करीत असेल, पाट्यावर वाटत असे, याशिवाय घराची रचनाही कोकणातील घरांप्रमाणे ठेवण्यात आली होती.

कोकणातील पारंपरिक मात्र काहीसे लुप्त झालेले खाद्यपदार्थ ते प्रेक्षकांसमोर ठेवत होते. त्यामुळे खूप कमी काळात ते प्रेक्षकांचं आवडतं युट्यूब चॅनल ठरलं होतं. दरम्यान सोशल मीडियावरुन शिऱीषच्या निधनाचं दु:ख व्यक्त केलं जात आहे. दोघांचे तिघे झाले होते, घरात वर्षभरापूर्वीच पाळणा हलला होता. त्यात शिरीषच्या निधनाने युट्यूबकरांमध्ये शोककळा पसरली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com