जाहिरात

'त्या' एका चुकीमुळे समुद्रात 8 पर्यटक बुडाले! 3 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Shiroda-Velaghar Tourist Drowning News : शिरोडा-वेळागर येथील समुद्रात दुपारी 4.45 वाजताच्या सुमारास 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली. यापैकी 4 जणांना समुद्रातून बाहेर काढलं असून तिघांचा मृत्यू झाला आहे.

'त्या' एका चुकीमुळे समुद्रात 8 पर्यटक बुडाले!  3 जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
Today Viral News of sea Drowning
मुंबई:

गुरुप्रसाद दळवी, प्रतिनिधी

Shiroda-Velaghar Tourist Drowning News : शिरोडा-वेळागर येथील समुद्रात दुपारी 4.45 वाजताच्या सुमारास 8 पर्यटक बुडाल्याची घटना घडली. यापैकी 4 जणांना समुद्रातून बाहेर काढलं असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला पर्यटक गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक लोकांकडून आणि बचाव पथकाकडून उर्वरित चार जणांचा शोध सुरु आहे. या महिलेला शिरोडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार, बेळगाव येथून एक कुटुंब पर्यटनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. हे कुटुंबीय कुडाळ येथील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आले. त्यानंतर दुपारी शिरोडा येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी एकत्रित जेवण केलं आणि नंतर काही जण शिरोडा येथील वेडाघर समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेले. परंतु, 8 जणांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटेच्या प्रवाहात वाहून गेले. कुटुंबातील लोक पाण्यात बुडत असल्याचं एका महिलेनं पाहिलं आणि तिने आरडाओरडा केला. 

त्या समुद्रात नेमकं काय घडलं? 

बेळगाव आणि कुडाळ येथील 8 पर्यटक शिरोडा वेळागर येथील समुद्रात पर्यटनासाठी आले  होते. या पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात पोहण्याचा मोह आवरला नाही. दुपारी 4:30 वाजताच्या सुमारास हे पर्यटक समुद्राच्या पाण्यात उतरले. पण त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले. पण एक महिला पर्यटक सुदैवाने बचावली. इसरा इम्रान कितुर असं या महिलेचं नाव आहे. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पर्यटकांचा शोध सुरू केला. दरम्यान, चार पर्यटकांना समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती अस्थिर आहे. तर समुद्रात बुडालेल्या उर्वरित चार पर्यटकांचा शोध सुरु आहे. 

नक्की वाचा >> गौतमी पाटीलला अटक होणार? 'त्या' प्रकरणात चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

समुद्रात बुडालेल्या पर्यटकांची नावे 

  • इसरा इम्रान कित्तूर, वय वर्ष 17 रा. लोंढा, बेळगाव (हयात)
  • फरहान इरफान कित्तूर, वय 34, रा. लोंढा, बेळगाव (मयत)
  • इबाद इरफान कित्तूर , वय १३ रा. लोंढा, बेळगाव (मयत)
  • नमीरा आफताब अख्तर वय 16, रा अल्लावर, बेळगाव (मयत)

बेपत्ता पर्यटकांची माहिती पुढीलप्रमाणे

  • इरफान मोहम्मद इसाक कित्तूर, वय 36 रा. लोंढा, बेळगाव 
  • इक्वान इमरान कित्तूर, वय 15 रा. लोंढा, बेळगाव 
  • फरहान मोहम्मद मणियार, वय 20, रा. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग 
  • जाकीर निसार मणियार वय 13, रा. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग.

नक्की वाचा >> Mumbai Metro : मेट्रो 2-A आणि 7 मार्गिका पूर्ववत, पण प्रवाशांचे झाले प्रचंड हाल, स्टेशनचा Video व्हायरल!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com