जाहिरात

Ratnagiri Dam : रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी; आता पाण्याचं No टेन्शन!

रत्नागिरी जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 28 धरणं 100 टक्के भरली असून 28 धरणं 50 टक्के पेक्षा जास्त भरली आहेत.

Ratnagiri Dam : रत्नागिरीकरांसाठी आनंदाची बातमी; आता पाण्याचं No टेन्शन!

कोकणात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. पुढील चार दिवस रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आली आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील 68 धरणांपैकी 28 धरणं 100 टक्के भरली असून 28 धरणं 50 टक्के पेक्षा जास्त भरली आहेत. मंडणगड तालुक्यातील 3, दापोली तालुक्यातील 3, खेडमधील 3, गुहागरमधील 1, चिपळूणमधील 6, संगमेश्वरमधील 3, रत्नागिरीमधील 1, लांजामधील 4, राजापूरमधील 4 धरणं 100 टक्के भरली आहेत. सर्व धरणांमध्ये 305.53 दलघमी पाणीसाठी असून सर्व धरणांमध्ये 68.48 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहे. 

Rain Update : राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट; खरीप हंगाम संकटात येण्याची भीती

नक्की वाचा - Rain Update : राज्यातील 20 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट; खरीप हंगाम संकटात येण्याची भीती

मुंबईतील जलशयांमधील पाणीसाठा...

पालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये सध्या 4,08,299 दशलक्ष लिटर (4.08 लाख दशलक्ष लिटर) पाणीसाठा जमा झाला आहे. हा साठा त्यांच्या एकूण क्षमतेच्या 28.21% इतका आहे.

जलाशयांमधील वैयक्तिक पाणीसाठा (टक्केवारीत):
जलाशयांच्या सध्याच्या पाणीसाठ्याची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे:

मोडक सागर: 44.78% (सर्वाधिक साठा)
विहार: 39.71%
तुळशी: 38.48%
अप्पर वैतरणा: 33.35%
तानसा: 30.04%
मध्य वैतरणा: 26.47%
भातसा: 23.14%
मुंबईच्या पाणीपुरवठ्याचे स्रोत आणि वितरण:
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com