जाहिरात

Saint Tukaram Maharaj Palkhi : आज मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण, हा सोहळा कुठे पाहता येईल?

संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील मानाचा आश्वाच दुसरं गोल रिंगण आज इंदापुरातील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. त

Saint Tukaram Maharaj Palkhi : आज मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण, हा सोहळा कुठे पाहता येईल?

देवा राखुंडे, प्रतिनिधी

(Pandharpur Wari) संत तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण आज इंदापुरातील कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे. तत्पूर्वी विद्यालयाच्या प्रांगणात इंदापूर शहरातील मूकबधिर व मतिमंद निवासी शाळेच्या विद्यार्थ्यांची दिंडी दाखल झाली. या दिंडीने लाखो वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. (Saint Tukaram Maharaj Palkhi)

Latest and Breaking News on NDTV

आज नागवेलीच्या पानांसाठी पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या इंदापूरच्या निमगाव केतकीचा (Saint Tukaram Maharaj ) निरोप घेऊन जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा पालखी सोहळा इंदापूरच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झालाय. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पालखीला खांदा दिल्यानंतर सोहळ्यान प्रस्थान ठेवलं. पालखी सोहळ्याचा आजचा मुक्काम इंदापूरमध्ये असणार आहे. दरम्यान डोक्यावर विठोबा रखुमाईची मूर्ती घेऊन हर्षवर्धन पाटील या वारी सहभागी झाल्याचा पाहायला मिळालं.

Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक

नक्की वाचा - Pune Palkhi 2025 : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण; कसा असेल पालखीमार्ग, पाहा वेळापत्रक

पहिलं गोल रिंगण उत्साहात पार पडलं...

२८ जून रोजी इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम आटोपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांचा पालखी बेलवाडी येथे दाखल झाली होती. लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात तो क्षण म्हणजेच बेलवाडी येथील अश्वांचं गोल रिंगण सोहळा. झेंडेकरी, हंडा, तुळशी, विणेकरी, टाळकरी,पखवाजे यांनी भक्तिमय वातावरणात प्रदक्षिणा घातल्या. यानंतर अश्वांनी तीन फेऱ्या मारल्या. यात मोहिते पाटलांचा अश्व पुढे धावला त्यावर स्वतः संत तुकाराम महाराज बसलेले असतात अशी वारकऱ्यांची धारणा आहे. त्या पाठीमागे बाभूळगावकरांचा अश्व धावला त्यावर चोपदार बसलेले होते. बाबुळगावकरांच्या अश्वाने मोहिते पाटलांच्या अश्वला शिवल्यानंतर हा सोहळा पूर्ण झाला.

अकोला विभागात आषाढी वारीसाठी तब्बल 270 एसटी बसेस सज्ज (Pandharpur Wari 2025)

आषाढात वारकऱ्यांसह एसटी घडविणार भविकांना विठ्ठल दर्शन पंढरपूर यात्रा विशेष नियोजन विठ्ठल भक्तांना पांडुरंगाची ओढ लागली असते. आषाढी एकादशीला संपूर्ण राज्यातून पालख्या, दिंडीसह हरीनामाचा गजर करीत लाखों वैष्णवांचा मेळा श्रीक्षेत्र पंढरपूरात भरतो. यंदाच्या आषाढीवारीच्या अनुषंगाने विठ्ठलभक्तांना आषाढी वारी घडविण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज झाली आहे. एसटी महामंडळ विभागातून यावर्षी अकोला जिल्ह्यातून तब्बल २७० बसेस धावणार आहेत. विभाग नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली २ ते १३ जुलै या कालावधीत पंढरपूर यात्रा बसेसचे नियोजन करण्यात आले..

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com