जाहिरात

Samruddhi Highway : नागपूर ते मुंबई आता अवघ्या 8 तासात; आज शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा!

विशेष म्हणजे या मार्गावरील एका बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा अवघ्या आठ मिनिटात पार करता येणार आहे.

Samruddhi Highway : नागपूर ते मुंबई आता अवघ्या 8 तासात; आज शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग आता पूर्णपणे सुरू झाला असून नागपूर ते मुंबईपर्यंत नॉन स्टॉप प्रवास करता येणार आहे. मुंबई समृद्धी महामार्गातील इगतपुरी - आमणे टप्प्याचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. 

आजपासून इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा रस्ताही प्रवाशांसाठी खुला होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी नागपूरहून न थांबता थेट मुंबईपर्यंतचा प्रवास करता येणार आहे. नागपूर ते मुंबई अशा रस्ते प्रवासासाठी एमएसआरडीसीने 701 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सुरू केला आहे. आतापर्यंत यातील 635 किलोमीटरचा मार्ग प्रवाशांसाठी खुला आहे. मात्र इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटरच्या रस्त्याचं काम सुरू होतं. अखेर ते पूर्णत्वास आलं आहे. आज 5 जून, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकर्पण होणार आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अवघ्या 8 तासांवर मुंबई...
लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी सुरू होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने (MSRDC) बांधलेला 701 किलोमीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख शहरांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणार आहे, ज्यामुळे प्रवासाचे 16 तास केवळ आठ तासांवर येणार आहे. 

Vande Bharat Express : नागपूर ते पुणे आणि मुंबई मार्गावरही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, कधीपासून होणार सुरू?

नक्की वाचा - Vande Bharat Express : नागपूर ते पुणे आणि मुंबई मार्गावरही धावणार वंदे भारत एक्स्प्रेस, कधीपासून होणार सुरू?

समृद्धी महामार्गाचे टप्पे...
नागपूर ते शिर्डी - 520 किमी
शिर्डी ते भरवीर - 80 किमी
भरवीर ते इगतपुरी - 25 किमी

इगतपुरी ते कसारा अवघ्या 8 मिनिटात..
इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरच्या मार्ग डोंगराळ आहे. त्यामुळे येथे पाच बोगदे उभारण्यात आले आहेत. त्यात इगतपुरी येथे 7.78 किमीचा राज्यातील सर्वाधित लांबीचा बोगदा असून यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर अवघ्या आठ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com