शरद सातपुते
बैलगाडा शर्यतीचे मोठे आकर्षण आहे. या बैलगाडी शर्यतीचा एक मोठा चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे. लाखोची बक्षिस ठेवून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. पण आतापर्यंतची सर्वात मोठी बैलगाडा शर्यत सांगली जिल्ह्यात होणार आहे. श्रीनाथ केसरी या नावाने ही स्पर्धा भरवली जाणार आहे. जो विजेता बैलगाडी मालक असेल त्याला श्रीनाथ केसरी देवून त्याचा सन्मान केला जाईल. या स्पर्धेत दोन विजेते निवडले जाणार आहेत अशी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनीच या स्पर्धेचे आयोजन केले आहे. शिवाय यावेळी मोठी बक्षिस ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे त्याची भूरळ नक्कीच बैलगाडा मालकांना पडले असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला आहे.
स्पर्धेसाठी दोन विजेते असतील. त्यामुळे बक्षिस रुपात दोन फॉर्च्यूनर, दोन थार, सात ट्रॅक्टर आणि 150 टू व्हिलर बक्षिस स्वरूपात देण्यात येणार आहेत. एवढी मोठी बक्षिसे ठेवण्या मागचा उद्देश ही पाटील यांनी सांगितला. जेवढं मोठं बक्षिस तेवढी मोठी किंमत बैलगाडा मालकांना भविष्यात मिळू शकते हा असल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यात फॉर्च्यूनर पेक्षा ही मोठं बक्षिस ठेवण्याचा आपला उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हा स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर बैलबाजारा मोठी उलाढाला झाल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
या स्पर्धेत उतरण्यासाठी बैलांची खरेदी होत आहे. 80 लाख ते दिड कोटीपर्यंत बैलांची खरेदी झालेली आहे. त्याचे पुरावेही आपल्याकडे आहेत असं पाटील म्हणाले. या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्याचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होणार आहे. येत्या 9 नोव्हेंबरला तासगाव पासून एक दहा किलोमीटर अंतरावर मनेराजुरी गावाजवळ ही स्पर्धा होईल. जवळपास 400 ते 500 एकरामध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बैलगाडा स्पर्धेला यातून जास्तीत जास्त चालना मिळणार आहे. शिवाय शेतकऱ्यांना ही प्रोत्साहन मिळणार आहे असं पाटील म्हणाले.
या शिवाय बैलगाडा मालकांना गो वंश संवर्धनाला चालना मिळावी ह्या उद्देशाने खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेचे आयोजन करत असल्याचं ते म्हणाले. डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी ही माहिती दिली आहे. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही 4 थी स्पर्धा आहे. या मागे गोवंश रक्षण आणि संवर्धन गावागावांमध्ये व्हावं. गाय असेल बैल असेल त्यांना संभाळण्याची जी जुनी पद्धत होती, ती आज सुरू झाली पाहीजे ही आपली भावना असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world