Sangli News : इस्लामपूरचे नाव बदलण्याची नितेश राणेंची मागणी, नवीन नावही सूचवलं

Nitesh Rane in Sangli : नितेश राणेंनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध नोंदवला. राज्यात आणि देशात लव्ह जिहाद कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. 

Advertisement
Read Time: 2 mins

शरद सातपुते, सांगली

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर झालेच पाहिजे. अन्यथा आम्हाला दुकानांवरील इस्लामपूर नावांच्या पाट्या बलावाव्या लागतील. आता जास्त काळ दुकानावर इस्लामपूर शब्द राहणार नाही,असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकापासून यल्लमा देवी चौकापर्यंत निघालेल्या या जनआक्रोश मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव सहभागी झाले होते. यावेळी आयोजित सभेतून बोलताना नितेश राणेंनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध नोंदवला. राज्यात आणि देशात लव्ह जिहाद कायदा करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. 

(नक्की वाचा -  मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक, उपोषणाची नवीन तारीख जाहीर)

पलूसमधील पोलिसांसोबत झालेल्या वादाबाबत स्पष्टीकरण देताना मी कशाला पोलिसांना धमकी देऊ? आम्ही पोलिसांकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. कारण नारायण राणे यांनी मुंबईत पोलिसांनी घरे मिळवून दिली आहेत. पोलीस आणि नारायण राणे व आमचे चांगले संबंध असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं. 

(नक्की वाचा-  'चुकीला माफी नाही', बीडच्या कार्यक्रमात अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?)

मालवण झालेल्या राड्यावर बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारेंवर जोरदार निशाणा साधला.  याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळल्यावरून जयदीप आपटे याला पोलिसांनी सोडल्यावर आपण मात्र आपटेला सोडणार नाही,अशा शब्दात नितेश राणे यांनी इशारा दिला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article